ऑनलाइन टिम :
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.जयंत पाटील यांनी ट्विट (twitter tweet) करत आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (corona positive) आली असल्याची माहिती दिली आहे.
जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये (twitter tweet) म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, तब्येत उत्तम आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे. लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करुन अशी विनंती करतो, असे त्यांनी म्हटले आहे. आपण जितके काम व्हर्च्युअली करणे शक्य होईल, सध्या तितके करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
----------------------------
Must Read
1) आजचे राशीभाविष बुधवार ,17 फेब्रुवारी २०२१..!!
2) वस्त्रनगरीतील गुन्हेगारीपुढेपोलिस हतबल..?
3) कोल्हापूर : किणी टोल नाक्यावर फास्टॅगसाठी वाहनांच्या रांगा