Dhanjay mundepolitics news- 'मी मंत्री झाल्यावर संकट थांबतील. असं वाटलं होतं पण राजकीय मैदानात हरवता येणे शक्य नाही त्या वेळेस माझ्या सोबत झालं ते होतंय. जोपर्यंत मायबाप जनतेच्या मनात विश्वास आहे म्हणून कुणी कितीही काही केलं तरी तुमच्या आशीर्वादाने काहीच होणार नाही' असं वक्तव्य करत वादग्रस्त शर्मा प्रकरणावर राष्ट्रवादीचे (politics party of india) (NCP) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay munde) यांनी जाहीर भाषणात टिप्पणी केली आहे.

धनंजय मुंडे यांच्या जन्मगावी विविध विकास कामांचे उद्घाटन (opening) व नागरी सत्कार सोहळ्याला पार पडला. यावेळी बोलत असताना कल्पना शर्मा प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत भाष्य केले. 'जो व्यक्ती 1 हजार लोकांसमोर बोलला लाख माणसाच्या सभेत बोलला त्या व्यक्तीला काय बोलावे प्रश्न पडवा, तशी माझी अवस्था झाली आहे. आज माझ्या जन्मगावात बोलतोय. राज्यातील राजकीय (politics news)जीवनातील भाषणाचे मुल्यमापन गावातील भाषणात करू नये' अशी विनंती ही मुंडेंनी पत्रकारांना केली.

------------------------------------

Must Read


1) अन्यथा तुमचे तुणतुणे बंद करू, राजू शेट्टी यांनी दिला इशारा


2) सनी लिओनीवर दाखल झाला गुन्हा.....!!!


3) सरकारने शेतकऱ्यांविरोधात सेलिब्रिटींना उतरवले


------------------------------------


'माझ्या गावात बोलताना सुरुवात कोठून करावी. आसराच्या डोहात पोहणे, सातभाईच्या बावडीत पोहायला शिकलो, वाण नदीत, पहाटेपर्यंत बत्तीच्या उजेडात मासे धरावीत, जुन्या आठवणी ना उजाळा देत गावात फिरताना अनेक सहकारी होते, गावातील परिस्थिती पहिली आताची पिढी बाहेर गावी राहत आहेत. मात्र, मी माझ्या आयुष्याचा शेवट नाथरा गावात घालेल, गावाचं आणि स्व.पंडित अण्णाचे नातं होतं. 

सर्वात जास्त नाथऱ्यात करमायचं, आमच्या शिक्षणासाठी परळीत घर केलं पण अण्णा रोज चार तास गावात यायचे लहानाचा मोठा तुमच्या देखत झालं. स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांनी राज्याचं  मुख्यमंत्री व्हावं यासाठी आम्ही काम करणारी माणसे कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं इथपर्यंत पोहोचलो, अशी भावनाही मुंडेंनी व्यक्त केली.

'माझ्याकडून तुमच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मी मुंडे साहेबांसारखं काम करावं, असं वाटतं, काहींना वाटत मी अण्णा सारखं वागावं. मात्र, मी एवढा मोठा नाहीये या गावाने मागितलं काहीच नाही. गावातील पुत्र मोठे झाले.. पण विकासाची अपेक्षा ठेवली नाही. हा मोठेपणा नाथराचे आहे. सगळे राजकीय वैभव नाथऱ्यांनी पाहिले मात्र गावाला शोभेल असा विकास पाह्यलं मिळाला नाही. पण आत्ता फुल नाही फुलाची पाकळी तरी  विकास करत आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

स्व अण्णांनी कठीण प्रसंगात गावाला जीव लावला, तसं गावाने आम्ही संकटात असताना सांभाळले. त्याचे उपकर फिटू शकणार नाहीत. तुम्ही कल्पना करु शकणार नाही एवढा विकास येत्या चार वर्षांत करेल. पिढ्यान पिढ्या या गावातील परिसरातील लोकांना अडचण येणार नाही, असा विकासच स्वप्न मी पाहिलं. माझ्या मातीतील प्रत्येक माणसाचं दरडोई उत्पन्न दुप्पट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.'असा शब्द धनंजय मुंडेंनी दिला.

'अनेक कठीण काळातून मी गेलो आहे. असा संघर्ष माझ्या नशिबी का आला, भगवंताला हात जोडून आभार मानतो. तू संकटं आणली म्हणून मी इथपर्यंत आलो. इमानदारीने काम केलं. आता लोक प्रेमाने भाऊ बोलता, अगोदर धन्या शिवाय बोलत नव्हते. नालायक नाही तर लायक होतो म्हणून आज हा सत्कार करत आहात माझा पुनर्जमावर विश्वास नाही. तरी होत असेल तर पुनर्जन्म द्यायचा असेल तर नाथऱ्याच्या मातीत दे' अशी मागणीच धनंजय मुंडे यांनी ग्रामदैवत मारुतीच्या चरणी मागितलं.