eknath khadaseऑनलाइन टिम:

politics news of india- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी नेहमीच भाजपमध्ये अन्याय झाल्याचे सांगितले आहे. नुकटाच जामनेर येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा भाजपवर तोफ डागली आहे. भाजपानं (political party of india) माझा जेवढा छळ केला आहे ते त्यांना महागात पडणार आहे असा इशारा खडसेंनी दिला आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपचे अनेक कार्यकर्ते आज पक्ष सोडत आहेत. त्यांच्या मॅनटा सुरक्षितता आहे. भाजपसाठी इतकं करूनही नाथाभाऊला न्याय मिळाला नाही, त्यांच्यामागे ईडी लावली जातेय, काय काय धंदे केले जातात, नाथाभाऊंना कसं तुरुंगात टाकता येईल असं बघितलं जातं आहे, पण मी एक मात्र सांगू इच्छितो की कधीही आयुष्यात धंदे केले नाहीत, आयुष्यात कधीही २ नंबरच्या धंद्यात पडलो नाही, अख्ख्या जळगाव जिल्ह्यात कोणीही सांगावं कोणाकडून नोकरीसाठी पैसे घेतलेत, कामासाठी पैसे घेतलेत, एकाने उभं राहावं आणि सांगावं नाथाभाऊ खोटं बोलतायेत असं आव्हानही त्यांनी दिले.

----------------------------

Must Read

-------------------------------

नाथाभाऊ ४० वर्षापासून असाच आहे, काहीच उद्योग केले नाहीत, म्हणून भाजप नाथाभाऊंबद्दल शोधून शोधून काढत आहे परंतु, काहीच सापडत नाही. बायकोने जमिनीचा व्यवहार केला पावणे चार कोटीचा, त्यात अर्धाव्याज आहे पावणे दोन कोटीचा, त्यात नाथाभाऊ खात्यावरून दिले २५ लाख रुपये, माझ्याकडे शेती आहे, मी जमीनदाराचा पोरगा आहे, तरीही त्याचसाठी नाथाभाऊंचा छळ सुरू आहे आणि छळणं महागात पडेल, पण भाजपाला मी सांगू इच्छितो जेवढं तुम्ही नाथाभाऊंचा छळ कराल तेवढचं तुमच्यापासून पदाधिकारी आणि माणसं दूर जातील ते राष्ट्रवादीकडे वळतील. असा इशाराही त्यांनी दिला. 

…आता मी सीडी लावण्याचं काम करणार

राष्ट्रवादीत (political party of india) प्रवेश करताना जयंत पाटलांसह अनेकांनी मला सांगितलं तुमच्या मागे ईडी लागू शकते, त्यावर मी प्रवेश मेळाव्यात म्हटलं होतं, माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन. आता माझ्यामागे प्रत्यक्षात ईडीची चौकशी लावली आहे, त्यामुळे मी सीडी लावण्याचं काम करणार आहे असं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपाला इशारा दिला.

माझा गुन्हा काय आहे?

विधानसभेच्या सभागृहात माझा गुन्हा काय आहे? असा प्रश्न वारंवार विचारत आलो, पण मला शेवटपर्यंत उत्तर दिले नाही. मी खूप संघर्ष केला. मात्र पाठीमागे खंजीर खुपसण्याचे काम मी कधी केले नाही. मी समोरासमोर लढलो. कधी विद्वेषाची भावना मनात ठेवली नाही. महिलेला समोर करून मी कधीही राजकारण केले नाही असं सांगताना एकनाथ खडसेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. बहुजन नेत्यांचं भाजपामध्ये जाणीवपूर्वक खच्चीकरण केलं जातं. ज्यांनी पक्षाला मोठं केलं, त्यांच्यावरच बेछूट आरोप केले. जे बापाचे होत नाहीत, ते जनतेचे काय होणार?”, असा आरोपही एकनाथ खडसेंनी केला आहे.