menstruation


मासिक पाळी (period) ही स्त्रिच्या शरीरातील असा एक नैसर्गिक बदल आहे जो प्रत्येक महिन्याला न चुकता होतो आणि तो आपल्या इच्छेप्रमाणे टाळणे किंवा आणणे कदापि शक्य नाही. मासिक पाळी दरम्यान मुड स्विंग्स होणं, इरिटेशन, पोटदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, पोटात क्रॅम्प्स येणं, मळमळ, उलटी, चिडचिड या समस्या होणं एकदम साधारण गोष् आहे. यातून प्रत्येक स्त्रिला जावंच लागतं. पण बर्‍याच वेळा मासिक पाळी (menstruation) अशा वेळी येते जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं असतं किंवा तुमच्या घरात किंवा नातेवाईकांकडे एखादा सोहळा, पूजा किंवा कोणताही धार्मिक विधी असतो.

बाजारात अनेक औषध उपलब्ध आहेत पण याचं अतिप्रमाणात सेवन करणं महागात पडू शकतं. पण ती वेळच अशी असते की तुम्ही असहाय्य होऊन ती औषधं घेऊन पाळी पुढे ढकलता. पण मैत्रीणींनो ही हानीकारक औषधं खाण्यापेक्षा आज आम्ही तुम्हाला जे सुरक्षित घरगुती सांगणार आहोत.

-------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत तलवार व चाकूघेऊन फिरणार्‍यांना अटक

2) सांगली- सतत पैशांसाठी त्रास देत असल्याने केला खून

3) सांगली- मराठा नेत्यांना फिरू देणार नाही

-------------------------------------

अ‍ॅप्पल व्हिनेगर

अ‍ॅप्पल व्हिनेगर पाळी (period)  पुढे ढकलण्यासाठी लाभदायक मानले जाते. काही अध्ययनांनुसार, यात खूप अ‍ॅसिड असतं जे आपली मासिक पाळी १० ते १२ दिवस सहज पुढे ढकलू शकतं. पण हे वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित नाही. मासिक पाळी येण्याआधी जवळ जवळ १० ते १२ दिवस आधी तुम्ही २ ते ३ वेळा अ‍ॅप्पल व्हिनेगरचं गरम पाण्यासोबत सेवन केल्यास पाळी आरामात पुढे ढकलू शकता. जर यामुळे मासिक पाळी पुढे ढकलली नाही तरी हा उपाय मासिक पाळीतील रक्तस्त्राव व क्रॅम्प्स कमी करण्यास मदत करतो.

जिलेटिन

जिलेटिन देखील मासिक पाळी लेट करण्यास मदत करतं. एक वाटी पाण्यामध्ये जिलेटिनचं पॅकेट व्यवस्थित मिसळून ते पाणी प्या, यामुळे मासिक पाळी पुढे ढकलली जाईल. जिलेटिनमुळे तुम्ही फक्त ३ ते ४ तासांसाठी पीरियड्स टाळू शकता. हे १ पेक्षा अनेक वेळा प्यायल्याने तुम्ही अनेक दिवस पाळी पुढे ढकलू शकता. हा चीन मधील प्राचीन घरगुती उपाय आहे. पण अधिक काळ असं करणं शरीरासाठी घातक देखील ठरू शकतं. म्हणून याचा मर्यादेतच वापर करावा.

लिंबाचा रस

लिंबाचा  (lime) रस देखील अ‍ॅप्पल व्हिनेगर प्रमाणे असतो. लिंबाचा रस व्हिटॅमिन सी या तत्वाने परिपूर्ण असतो. लिंबाचा रस व्हिटॅमिन व सिट्रिक अ‍ॅसिडचा मुख्य स्त्रोत आहे. मासिक पाळी यायच्या आधी हा रस प्यायल्याने पाळी रोखता येऊ शकते. तसंच लिंबाचा रस ब्लड फ्लो कमी करतं आणि मासिक पाळीशी निगडीत इतर समस्या दूर करण्यास देखील लाभदायक मानलं जातं. त्यामुळे लिंबाचा रस मासिक पाळी पुढे ढकलण्यास, जास्त ब्लड फ्लो होत असल्यास तो कमी करण्यास कामी येतो. यासाठी लिंबू चावून देखील खाऊ शकता. लिंबू चावणं शक्य नसल्यास पाण्याच पिळून त्याचं देखील सेवन करू शकता.