entertainment news- साऊथ मधील प्रेक्षक चित्रपटांचे निस्सीम चाहते आहेत. हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. ते आपल्या आवडीच्या चित्रपटांसाठी, त्यातील अभिनेत्यासाठी काहीही करु शकतील. याची प्रचिती देणारे अनेक दाखले आपल्याला(social media) सोशल मीडियावर पाहायला, वाचायला मिळतील. तिकडे आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट  प्रदर्शित होतो आहे असे समजल्यावर त्याच्या फोटोला दुधाचा अभिषेक घातला जातो.

 केक कापून आनंद साजरा केला जातो. सध्या चर्चा यशच्या केजीएफ चित्रपटाची सुरु असून त्याच्या प्रदर्शनाच्या दिवशी एक आगळी वेगळी मागणी साऊथच्या प्रेक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींजींकडे केली आहे. हेही वाचा : 'जली ना, तेरी जली ना?'; पॉपस्टार रिहानाशी 'पंगा' घेणाऱ्या कंगनावर भन्नाट मीम्स व्हायरल 'KGF 2' मध्ये यशनं प्रमुख भूमिका साकारली आहे.

 त्याच्या चाहत्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून KGF 2 च्या रिलीजच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली आहे. 'केजीएफ 2' हा चित्रपट 16 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा (social media)सोशल मीडियावर होत आहे. आतापर्यत त्याच्या टीझर, प्रोमोला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळाली होती.

 गेल्या तीन वर्षांपासून केजीएफच्या दुस-या भागाची प्रतिक्षा चाहते करताना दिसत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सोशल मीडियावर यशच्या चाहत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘केजीएफ 2’च्या रिलीजच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यासाठी पत्र लिहिले आहे.