pm narendra modipolitics news in india - पंतप्रधान नरेंद्र मोदी  (pm narendra modi) यांच्या कामावर टीका करत भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या नाना पटोले यांच्या हाती महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रं देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची चर्चा सुरू होती. यात अनेक नाव आघाडीवर होती. 

अखेर प्रदेशाध्यपदी काँग्रेस नाना पटोले यांची नियुक्ती करत तर्कविर्तकांना पूर्णविराम दिला आहे. पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचं नावं प्रदेशाध्यपदासाठी निश्चित झाल्याचं मानलं जात होतं.

--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

२०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून नाना पटोले यांनी भाजपाच्या (bjp) तिकिटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पण पाच वर्षाच्या आताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढत त्यांनी विजय संपादित केला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आले. महाआघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. (politics news in india)