shivsena on nana patoleindian politics- काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले (Nana Patole) यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर सध्या राजकीय (politics) वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पटोले यांनी अगोदरच विधानसभेच्या सभापतीपदाचा राजीनामा दिला होता. विधानसभा अध्यक्ष कोण होईल याबाबत तीन पक्षाचे सरकार सोनिया गांधी, शरद पवार आणि ठाकरे हेच चर्चा करतील, अशीही प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे. 

दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या अग्रलेखातून शिवसेनेने काँग्रेस या बदलाबाबत कान टोचले आहेत. काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपद बदलल्याने शिवसेनेने काँग्रेसवर टीका केली आहे. महाविकास आघाडीतील एका पक्षाने दुसऱ्या महत्त्वाच्या पक्षाला घरचा आहेर दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. शिवसेनेने या अग्रलेखातून काँग्रेसच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली असून विधानसभा (assembly election)अध्यक्ष निवडणूक पुन्हा होणार, त्यात मतदान याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

-------------------------------

Must Read

1)कबनूर परिसरातील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

2)UPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

3)सांगली मुकादमकडून ८ लाखाला गडा

--------------------------------

'विधानसभेचे अध्यक्षपद एका वर्षात राजीनामा देण्यासाठी नाही'

यामध्ये शिवसेनेने या अग्रलेखाची सुरुवात करतानाच असे म्हटले आहे की, 'काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिले ते पाच वर्षांसाठी. फक्त एक वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही. ते काही असले तरी यातून आता मार्ग काढावा लागेल. काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार; पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही यासाठी सावधान राहावे (indian politics) लागेल. 

काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळत आहे, त्याचबरोबर विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल. पटोले हे विधानसभा अध्यक्षपदावरून गेले, पण काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राज्याच्या मुख्य प्रवाहात परत आले. म्हणजे नाना गेले, नाना आले! नानांना शुभेच्छा!' अशाप्रकारे शिवसेनेने नानांना शुभेच्छा तर दिल्याच आहेत पण एवढ्या लगेल पद बदल्याबाबत टीकाही केली आहे.