Murder of a farmerऑनलाइन टिम :

पुसेगाव (जि. सातारा) : दरजाई (ता. खटाव) येथील शेतकऱ्याचा अज्ञात व्यक्तीने खून (Murder) केला. संपत गुलाब सत्रे (वय 55, रा. दरजाई, ता. खटाव) असे मृताचे (Dead) नाव आहे. या घटनेची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, आपल्या शेतात गेलेले संपत सत्रे हे मंगळवारी (ता. 16) संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान पाऊलवाटेने घरी परत येत असताना अज्ञात व्यक्तीने डोक्‍यात व डाव्या कानावर हत्याराने मारून त्यांना गंभीर जखमी (Seriously injured) केले.या मारहाणीत संपत सत्रे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी निलम संपत सत्रे यांनी फिर्याद दिली आहे. पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक (Inspector) विश्वजित घोडके हे तपास (Investigation) करत आहेत.

 ----------------------------

या घटनेनंतर कोरेगाव येथील पोलिस उपअधीक्षक गणेश किद्रे, सातारा येथील गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक धुमाळ, सातारा येथील श्वान पथक व पुसेगाव पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी तपास पथके पाठविण्यात आली आहेत.