robbery murder caseवारणानगर चोरी प्रकरणातील (robbery) मुख्य संशयित मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन मुल्ला सतत पैशांसह व्यवसायाबाबत त्रास देत असल्यानेच त्याचा खून केला, अशी कबुली अटकेतील संशयितांनी पोलिसांना दिली आहे. आर्थिक वादातून हा खून (murder) झाला आहे. मात्र, कोणता आर्थिक वाद होता, याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितले. दरम्यान, तिन्ही संशयितांना दि. 6 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आप्पा ऊर्फ भीमराव वाणी, नाना ऊर्फ बाळासाहेब पुकळे, शफीक खलिफा, रवी चंडाळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील रवी चंडाळेला हैदराबाद येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. सोमवारी रात्री वाणी, पुकळे, खलिफा यांना जतमधून अटक करण्यात आली. चौघांनाही अटक केल्यानंतर सोमवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली.

------------------------------------

Must Read

1) हुपरीत आत्मदहनाचा प्रयत्न, घटनेचे चित्रीकरण करण्यावरून बाचाबाची

2) Nora Fatehi चा सेक्सी डान्स बघून आईने फेकून मारली चप्पल....

3) Gold Silver Price Today : सोने एवढे कसे महागले? वाचा आजचे दर

-------------------------------------

या चौकशीत मैनुद्दीन याने वाणीसह अन्य संशयितांना कोणताही व्यवसाय करताना भागीदारी द्या असा तगादा लावला होता. शिवाय त्याच्याकडून वारंवार पैशांची मागणी होत होती. मैनुद्दीन तिघाही संशयितांना वारंवार त्रास देत होता. त्यामुळे त्यांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले होते. शुक्रवारी क्लबसाठी जागा पाहण्याच्या बहाण्याने त्याला बोलावून घेऊन त्याचा गेम करण्यात आला.


मिरज रस्त्यावरही लावली होती फिल्डिंग


संशयित रवि चंडाळे याने दहा दिवसांपूर्वी त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. शिवाय या संशयितांनी मैनुद्दीनला सांगली मिरज रस्त्यावरील एका हॉस्पिटलसमोर मारण्याचाही प्लॅन केला होता. मात्र तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे त्यांचा प्लॅन फसला होता असेही पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.


सर्व बाजूंनी खुनाचा तपास करणार


मृत मैनुद्दीनचा वारणानगर येथील चोरी प्रकरणात सहभाग होता. प्राथमिक चौकशी अहवालात आर्थिक वादातून त्याचा खून (murder) झाल्याचे स्पष्ट झाले आहे, तरीही या खुनामागे कोणी सूत्रधार आहे का, तसेच वारणानगर येथील चोरी प्रकरणातील कोणाचा यात सहभाग आहे का, याबाबतही सखोल तपास करण्यात येणार आहे. आर्थिक वाद सोडून अन्य काही कारणे आहेत का, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी सांगितले.