ऑनलाइन टिम :
Crime News-क्रिकेट (Cricket) मॅच जिंकल्यानंतर पैशाच्या देवाण घेवाणीवरुन तिघांनी चाकूंनी केलेल्या हल्ल्यात (Attack) एकजण गंभीर जखमी (Injured) झाला. विशाल महादेव कांबळे (वय २३, रा. साठे गल्ली , साईट नं.१०२) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी रोहित बाळू तडाखे (रा. जाधवमळा), बच्चन लक्ष्मण कांबळे व शाहुल दिलीप कांबळे (दोघे रा.साईट नं. १०२) या तिघांना अटक करण्यात आली आहे .
या प्रकरणी गावभाग पोलिसात गुन्हा (Crime) नोंद करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, साईट नं. १०२ मध्ये फिर्यादी व संशयित आरोपी यांच्यात क्रिकेट मॅच झाली होती. क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर लावलेल्या पैजेवरुन वाद निर्माण झाला होता. त्यातूनच रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रोहित 'तडाखे, बच्चन कांबळे, शाहुल कांबळे हे तिघे विशाल कांबळे याच्या घरी गेले.
Must Read
1) आजचे राशीभाविष सोमवार,15 फेब्रुवारी २०२१..!!
2) इचलकरंजीचे श्रीमंत घोरपडे नाट्यगृह दुरवस्थेत..!!
3) धावत्या रेल्वेत ओळखीच्या व्यक्तीनेच केला मुलीवर अत्याचार..!!
परंतु तो घरी नसल्याने तिघांनी त्याच्या नातेवाईकांसमोर विशालला शिवीगाळ करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.त्याचवेळी सांगली रोड ते साईट नं. १०२ रस्त्यावरील कमानीजवळ विशाल हा मोटरसायकलवरुन येताना दिसला. त्या तिघांनी त्याला रस्त्यातच अडवले आणि रोहितने विशाल याला मारहाण (Beating) करण्यास सुरुवात केल. तर बच्चन याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
रोहित याने तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत चाकूने विशालच्या पाठीत वार केला. त्याचवेळी बच्चनने त्याला मार जिवंत ठेवू नको असे म्हणताच रोहितने पुन्हा विशालच्या पाठीत चार वार केल्याने रोहित रस्त्यावरच कोसळला. त्यानंतर संशयितांनी तेथून पलायन केले. नातेवाईकांनी जखमी (Injured) विशाल याला तातडीने उपचारासाठी सांगली रुग्णालयात (Hospital) दाखल केले आहे. दरम्यान, गावभाग पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत संशयित रोहित तडाखे, बच्चन कांबळे व शाहुल कांबळे या तिघांनाही अटक केली आहे.