Murder attack on Ichalkaranji youthCrime News- इचलकरंजीत चौघांच्यावर गुन्हा दाखल पूर्ववैमनस्यातून (prejudice) चौघांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला. राहुल इंद्रजित पोळ (वय २६ रा. कबनुर) असे जखमी युवकाचे आहे. ही घटना येथील बरगे मळ्यात घडली. या प्रकरणी छ.शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील सिद्धार्थ होसिंग सोसायटीमध्ये राहणारे आशितोष भाईमाने, रोहन कांबळे, तुषार शिंदे, विकास शेवाळे आणि कबनूर येथील राहुल पोळ यांच्यात किरकोळ

----------------------------

Must Read

------------------------------

कारणावरून वैमनस्य  (prejudice)  निर्माण झाले आहे. त्याच कारणातून यापूर्वीही चौघांनी तीनवेळा राहुल याला मारहाण केली होती. पण प्रत्येकवेळी पोलिसात तता तक्रार न देता प्रकरण आपापसात मिटवले गेले होते. शुक्रवारी रात्री राहुल पोळ हा बरगे मळा परिसरात आला होता. त्यावेळी उपरोक्त चौधा संशयितांनी यंत्रमागाच्या मान्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून मारहाण केली. त्यामध्ये राहुल हा गंभीर जखमी झाला असून त्याला नातेवाईकांनी उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जावून राहुल याच्या तक्रारीवरुन चौघा संशयीतांवर गुन्हा दाखल केला आहे.