mumbai-pune-express-way-accident



ऑनलाइन टिम :

Accident News- सोमवारची रात्र नवी मुंबईतील झुंजारेकुटुंबीयांसाठी काळरात्र ठरली. हा अपघात (Accident) इतका भीषण होता की यात 5 जणांचा मृत्यू तर 5 जण जंखमी आहेत. यापैकी दोघांची परिस्थिती गंभीर आहे. तर मृतांमध्ये 5 वर्षीय चिमुरडीचाही समावेश आहे. झुंजारे कुटुंबातील 4 जणांचा एकाचवेळी मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. नवी मुंबई मनपा अधिकारी वैभव झुंजारे यांचा त्यांच्या (Family) कुटुंबातील इतर 3 जणांसह मृत्यू झाला आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Express Weave) सोमवारी मध्यरात्री मुंबई लेनवर खालापूर टोल नाक्याजवळ हा अपघात (Accident)  हा भीषण अपघात झाला. अपघातातील मृत व्यक्ती हे नवी मुंबई नेरूळ येथील झुंजारे कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. भरधाव कंटेनरच्या चालकाचं नियंत्रण (Control) सुटल्याने पुढे जाणाऱ्या इनोवा, क्रेटा ,टेम्पो , ट्रक अशा चार वाहनांना मागून जोरदार धडक दिल्याने ही घटना घडली आहे. त्याठिकाणची ही दृश्य अतिशय भीषण आहेत. यामध्ये गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

--------------------------

मुंबईच्या गोरेगावमधील मंजू प्रकाश नाहर (वय 58), नवी मुंबईच्या नेरुळ याठिकाणचे डॉ. वैभव वसंत झुंजारे (41), उषा वसंत झुंजारे (63), वैशाली वैभव झुंजारे (38), श्रिया वैभव झुंजारे (5) अशी या अपघातात मृत पावलेल्यांची नाव आहेत. झुंजारे कुटुंबाने एकाच वेळी 4 जण गमावले आहेत. तर याच (Family)  कुटुंबतील 11 वर्षीय अर्णव वैभव झुंजारे जखमी आहे.एकूण 5 जण या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर परिसरातील तीन विविध रुग्णालयांमध्ये उपचार (Treatment)  सुरू आहेत. अर्णवसह गोरेगावमधील स्वप्नील सोनाजी कांबळे (30), प्रकाश हेमराज नाहर (65) हे लोकं या अपघातात जखमी झाले आहेत. 

तर किशन चौधरी आणि काळूराम जमनाजी जाट गंभीर जखमी (Seriously injured) आहेत.दरम्यान या अपघातातील मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघातानंतर महामार्गावर मुंबईच्या दिशेन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. परंतु आता सर्व अपघातग्रस्त वाहनं महामार्गावरून बाजूला केल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत झालेली आहे