crime news- दादरा हवेलीचे खासदार मोहनभाई संजीभाई देलकर (वय- ५९) यांचा मृतदेह मारिन ड्राईव्ह येथील सी ग्रीन साऊथ हॉटेलमध्ये आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आत्महत्येचा (suicide) संशय व्यक्त केला जात आहे.
मोहन देलकर हॉटेलमधील ज्या खोलीत होते, तिथे गुजराती भाषेत लिहिलेली सुसाइड नोट देखील पोलिसांना आढळून आली आहे. मोहन देलकर हे अपक्ष खासदार होते. त्यांच्या पश्चात पत्नी कालाबेन देलकर व दोन मुलं अभिनव व दिविता असा परिवार आहे.
----------------------------------
Must Read
1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम
3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले
------------------------------------
मोहन दलेकर यांनी आत्महत्येपूर्वी (crime news) लिहिलेल्या चिठ्ठीत(सुसाइड नोट) काही बड्या लोकांची नावं असण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ही सुसाइड (suicide) नोट पोलिसांच्या ताब्यात आहे.
१९८९ मध्ये पहिल्यांदा मोहन दलेकर हे दादरा हवेलीचे खासदार म्हणून लोकसभेत गेले होते. त्यानंतर ते अनेकदा खासदार झाले. भारतीय नवशक्ती पार्टीचे देखील ते खासदार झाले होते. २००९मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र मागील लोकसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती.