chennai super kingssports news- इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू (cricketer) मोईन अली याला धोनीच्या चेन्नई संघानं खरेदी केलं आहे. चेन्नईनं मोईन अलीला सात कोटी रुपयांत खरेदी केलं. मोईनसाठी चेन्नई (chennai super kings) आणि पंजाबमध्ये स्पर्धा लागली होती. अखेर चेन्नईनं मोईन अलीला आपल्या चमूमध्ये सहभागी करुन घेतलं आहे.

इंग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीसाठी फ्रँचाजींमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. चेन्नई आणि पंजाब मोईन अलीला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी उत्सुक होत्या. मोईन अलीला आरसीबीनं करारमुक्त केलं होतं. मोईन अलीची मूळ किंमत दोन कोटी रुपये इतकी होती.

----------------------------

मोईन अलीनं १७ सामन्यात फलंदाजी करताना तीन अर्धशतकाच्या मदतीनं ३०९ धावा चोपल्या आहेत. मोईन अली विस्फोटक फलंदाजीसोबत ऑफ स्पिन गोलंदाजी करण्यात माहिर आहे. आरसीबीच्या संघात सध्या एकही असा फिरकी गोलंदाज नसल्यामुळे चेन्नईनं मोईन अलीला घेतलं आहे.

मोईन अलीने चेन्नई कसोटीत घेतल्यात ८ विकेट

नुकत्याच भारताविरोधात झालेल्या चेन्नई (chennai super kings) कसोटीत मोईन अलीनं अष्टपैलू खेळी करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मोईन अलीनं सामन्यात ८ विकेट घेतल्या होत्या. तर चौथ्या डावांत फलंदाजी तरताना १८ चेंडूत ४३ धावा चोपल्या आहेत.