raj Thackeraypolitics news- कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जोरदार तडाखा बसला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत (political parties) प्रवेश करून २४ तास उलटण्याआधीच ज्येष्ठ नगरसेवक मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश करत मनसेला खिंडार पाडलं. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्वाचा निर्णय घेतला असून लोकसभा मतदारसंघाप्रमाणे समित्या स्थापन करा असे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत.

राज ठाकरे यांची नुकतीच पक्षातील नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाप्रमाणे समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांच्यावरही मोठी जबाबदारी देण्यात आली असून लोकसभा मतदारसंघ त्यांच्याकडे सोपवण्यात आल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. मतदारसंघातील मनपा वॉर्डची संपूर्ण जबाबदारी या समितीवर असणार आहे.

-------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत तलवार व चाकूघेऊन फिरणार्‍यांना अटक

2) सांगली- सतत पैशांसाठी त्रास देत असल्याने केला खून

3) सांगली- मराठा नेत्यांना फिरू देणार नाही

-------------------------------------

“अमित ठाकरे उत्तम प्रकारचं काम करु शकतील असा आम्हाला विश्वास आहे. अमित ठाकरे संयमाने सर्व काम करु शकतात. म्हणूनच राज ठाकरेंनी इतर नेत्यांप्रमाणे त्यांच्यावरही जबाबदारी दिली आहे,” अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

“प्रत्येक शाखेत जे वास्तव आहे ते राज ठाकरेंसमोर आणायचं आहे. जी परिस्थिती आहे ती मांडायची आहे. मुंबईपासून सुरुवात केली असून नंतर ठाणे, पुणे, नाशिक येथे जाऊ,” असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान डोंबिवलीतील घडामोडींवर बैठकीत चर्चा झाली की नाही विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यावर काही चर्चा झाली नाही. तो विषय संपला आहे, आता पुढे काय करायचं यावर चर्चा झाली”. (politics news)

डोंबिवलीतील मनसेचे  (political parties)  माजी शहराध्यक्ष तसेच प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेला डोंबिवलीत धक्का बसला आहे. हा पक्षप्रवेश घडून आणण्यासाठी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याची चर्चा आहे.

मनसेचा एक नगरसेवक काही दिवसांपासून भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यास इच्छुक आहे. पण त्याला पक्षप्रवेशासाठी वरिष्ठांकडून तारीख मिळत नसल्याने या नगरसेवकाचा भाजप पक्षप्रवेश लांबत आहे. असे असतानाच मनसेच्या स्थापनेपासून पक्षात असलेले राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतर ते शिवसेना सोडून मनसेत दाखल झाले होते.