mns


मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मराठीत न बोलणाऱ्या एका कर्मचाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होत आहे.

वाशी टोलनाक्यावर ग्राहकासोबत अरेरावी भाषेत बोलणाऱ्या कर्मचाऱ्याला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कर्मचाऱ्याला ग्राहकानं मराठीत बोलण्यासं सांगितलं होतं. यावर या कर्मचाऱ्यानं उडवाउडवीची उत्तरं देत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या कर्मचाऱ्याला चोप दिला आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यानं माफी मागितली आहे. वाशी टोल नाक्यावर एका ग्राहकासोबत बोलताना माझ्याकडून जी गैरवर्तवणूक झाली त्याबद्दल माफी मागतो. माझ्याकडून चुकून एक वाक्य आलं. मी राज ठाकरे यांची माफी मागतो. यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही, अशा शब्दांत कर्मचारी व्हिडिओत (social media viral video) माफी मागताना दिसत आहे.

---------------------------------

Must Read

1) आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली आज भव्य मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ

2) ...अन्यथा कोल्हापूरचा वणवा राज्यभर पेटेल

3) Propose Day : प्रपोज करण्यासाठी 'हे' फंडे वापराल तर नकाराचं टेंशन विसराल....

---------------------------------

याप्रकरणी मनसेचे नवी मुंबईचे पदधिकारी जगदीश खांडेकर यांनी भाष्य केलं आहे. आम्हाला आमच्या मनसेच्या नवी मुंबई टीमवर विश्वास आहे. ती व्यक्ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत बोलत होती. आज राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शंभर पेक्षा जास्त खटले स्वतःवर घेतले आहेत. त्यामुळं अशाप्रकरचा अपमान सहन केला जाणार नाही. 

अशाप्रकारे अपमान करणाऱ्यांना चोप दिला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शिवाय, तो कर्मचारी परप्रांतीय आहे त्याला मराठी शिकवा इतकच आमचा कार्यकर्ता म्हणाला होता. त्यावर त्या व्यक्तीने उलट शब्दांत उत्तर दिलं, असंही त्यांनी म्हटलं आहे. टीव्ही ने दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.