MLA prakash awade


local news- इचलकरंजीच्या जनतेला शुद्ध पाणी मिळावे यासाठी, आमदार प्रकाश आवाडे यांचा सातत्याचा पाठपुरावा चालू होता. त्यांच्या याच प्रयत्नातून शहरामध्ये १०० शुद्ध पेयजल प्रकल्पासाठी (tds for drinking water) नाविन्यपूर्ण योजनेतून ४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यापैकी योजनेतील पहिल्या शुद्ध पेयजल प्रकल्पाचा शुभारंभ कामगारवस्ती असलेल्या आसरानगर इचलकरंजी येथे करण्यात आले.

या योजनेतून नागरिकांना २४ तास शुद्ध व मुबलक असे पाणी पिण्यासाठी (drinking water) व अन्न शिजवण्यासाठी मोफत शहरात विविध ठिकाणी १०० शुद्ध पेयजल (tds for drinking water) उभारण्यात येणार आहेत. तरी सर्व नागरिकांना याचा नक्की लाभ होणार आहे, असा विश्वास आहे.--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

यावेळी आमदार प्रकाश आवाडेजिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे , पाणीपुरवठा सभापती दिपक सुर्वे, आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक सुनील पाटील, नगरसेवक विठ्ठल चोपडे, ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माजी नगराध्यक्षा रत्नप्रभा भागवत, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, प्रकाश मोरे, बाळासाहेब पाटील, सचिन वरपे, अनिकेत चव्हाण, बिलाल पटवेगार, मित्तू सूर्यवंशी, रामा नाईक, रामा पाटील, जीवन कोळी, समाधान नेटके व भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.