लॉकडाउन (lockdown) काळानंतर आलेल्या भरमसाठ वीज देयकामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यामुळे राज्यभरातील ६४ लाख ५२ हजार १५० ग्राहकांनी मागील सहा महिन्यांत एकाही देयकाचा भरणा केलेला नाही. लॉकडाऊनच्या काळात आकारलेल्या वाढीव बिलात (electricity bill) सवलत दिली जाणार नाही, अशी भूमिका ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितल्यावर लोकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत आणि सवलती देण्याबाबत फेरविचार झाला पाहिजे अशी मागणी केली जात आहे.

लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिलात (electricity bill) 100 युनिटपर्यंत सवलत द्यावी व यंत्रमाग आणि लघुउद्योगांना 1 रुपयाची सवलत मिळावी यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ताराराणी पक्षातर्फे,  ताराराणी पक्ष कार्यालय इचलकरंजी ते महावितरण कार्यालय कोल्हापूर पर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे.

-------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत तलवार व चाकूघेऊन फिरणार्‍यांना अटक

2) सांगली- सतत पैशांसाठी त्रास देत असल्याने केला खून

3) सांगली- मराठा नेत्यांना फिरू देणार नाही

-------------------------------------

सोमवार दि. 8 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 वाजता इचलकरंजी ते महावितरण कार्यालय कोल्हापूर पर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे.