kolhapur Municipal corporationआगामी महापालिका (Municipal) निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद याचा निश्चितपणे वापर करू, यावेळी महापौर हा शिवसेनेचाच असेल असा दावा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

यावेळी ते म्हणाले, पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी महापालिका (Municipalनिवडणुकीचा अधिकार आपल्याला दिला आहे. मतदानाच्या आधीच्या दोन रात्री काही चक्रे उलटी फिरतात त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा निसटता पराभव होतो. मात्र यावेळी आम्ही सर्व तयारीनिशी मैदानात उतरणार आहोत. त्यामुळे यावेळी किमान तीस जागा निवडून आणू. महापौर हा शिवसेनेचा असेल. 

------------------------------------

Must Read

1) हुपरीत आत्मदहनाचा प्रयत्न, घटनेचे चित्रीकरण करण्यावरून बाचाबाची

2) Nora Fatehi चा सेक्सी डान्स बघून आईने फेकून मारली चप्पल....

3) Gold Silver Price Today : सोने एवढे कसे महागले? वाचा आजचे दर

-------------------------------------


अन्य पक्षातून जे उमेदवार शिवसेनेत येऊ इच्छितात, त्यांची निभावण्याची क्षमता असेल तर त्यांनाही तिकीट दिले जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक अजित मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचे पुत्र अभिजीत देवणे यांच्यासह नंदकुमार मोरे, राजू मोहिते, महेश उत्तुरे, ऋतुराज क्षीरसागर, उत्तरचे शहर प्रमुख रवींद्र यादव, वैशाली शिरसागर, सरिता मोरे आदी संभाव्य उमेदवार उपस्थित होते.