Marathapolitics news - मराठा समाजाचे (Maratha) आरक्षण, मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्के सवलत, जातीनिहाय जनगणना या मुद्द्यांवर मराठा समाजातील सर्वपक्षीय नेत्यांनी भूमिका जाहीर करून पाठपुरावा करावा, अन्यथा मराठा समाजातील कार्यकर्ते मराठा नेत्यांना फिरू देणार नाहीत, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज येथे दिला.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा सकल समाज आणि क्रांती मोर्चा यांच्यातर्फे आक्रोश आंदोलन करण्यात आले. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी सरकार आणि नेत्यांवर जोरदार टीका केली. नेत्यांनी मौन पाळून दुटप्पी भूमिका न घेता मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी प्रयत्न करावा, अन्यथा समाजातील जनता तुम्हाला धडा शिकवेल, असाही इशारा देण्यात आला.

------------------------------------

Must Read

1) हुपरीत आत्मदहनाचा प्रयत्न, घटनेचे चित्रीकरण करण्यावरून बाचाबाची

2) Nora Fatehi चा सेक्सी डान्स बघून आईने फेकून मारली चप्पल....

3) Gold Silver Price Today : सोने एवढे कसे महागले? वाचा आजचे दर

-------------------------------------मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे विलास देसाई, सतीश साखळकर, विश्वजित पाटील, अजय देशमुख, डॉ. संजय पाटील, महेश खराडे, युवराज शिंदे, प्रशांत भोसले, अभिजित शिंदे, श्रीरंग पाटील, नितीन चव्हाण, अशोक पाटील यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.


दरम्यान, आंदोलनाच्या ठिकाणी आमदार सुधीर गाडगीळ, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, जितेश कदम, भाजपचे दीपक शिंदे, पृथ्वीराज पवार यांनी भेट दिली.


शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यामध्ये म्हटले आहे की, मराठा विद्यार्थ्यांना 50 टक्के फी माफी द्यावी. जिल्ह्यातील मुला-मुलींचे वसतिगृह वर्षापासून बंद आहे. महापालिकेच्या बंद शाळाचा वापर वसतिगृहासाठी करावा. विविध शासन निर्णयांच्या निर्देशाचे पालन न केल्याने अन्याय झालेल्या सर्व मराठा महिला उमेदवारांना शासकीय सेवेत समावून घ्यावे.


मराठा आरक्षण स्थगितीपूर्वी ज्या निवड प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत, अशा सर्व विभागातील मराठा उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात. स्थगितीपूर्वी सुरू झालेल्या व अंतिम टप्प्यात असलेल्या निवड प्रक्रियांना संरक्षण द्यावे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून खुल्या प्रवर्गातून स्पर्धा करण्याची संधी कमी करण्यात आली आहे. हा निर्णय मराठा समाजासह खुल्या प्रवर्गावर अन्याय करणारा असल्याने तो रद्द करावा. सारथी संस्थेला आवश्यक असणारे सक्षम प्रकल्प अधिकारी व मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे.


मराठा (Maratha)  आणि ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी. ओबीसी समुहाचे जातनिहाय फेरसर्वेक्षण करण्यात यावे. ओबीसी समुहाचे शासकीय सेवामधील जातनिहाय प्रतिनिधित्व व आरक्षणाचे लाभ घेऊन खुल्या प्रवर्गातून मिळालेल्या अतिरिक्त लाभाचे सर्वेक्षण करून श्वेतपत्रिका काढावी. खुल्या प्रवर्गात आरक्षणाचे लाभ सोडून स्पर्धा करण्याची संधी मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारास द्यावी, मात्र आरक्षणाचे सर्व लाभ आणि सवलती घेऊन देखील गुणवत्तेच्या नावाखाली खुल्या प्रवर्गातून दिले जाणारे अतिरिक्त लाभ देणे बंद करावे.


नेते केवळ फोटोसेशनसाठी येतात का?


आंदोलनाच्या ठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांनी भेट दिली. नेते आल्यानंतर त्यांच्या संबंधित पक्षाचे कार्यकर्ते त्यांना घेण्यासाठी आणि परत सोडण्यासाठी गाडीपर्यंत जात होते. नेत्यांनी त्यांची भूमिकाही स्पष्ट केली नाही. त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांवर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर जोरदार टीका केली. नेतेमंडळी हजेरी लावून केवळ फोटोसेशन करण्यासाठी येतात का, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.