photo on social media


ऑनलाइन टिम:

मलायका अरोरा हिचे काही जुने फोटो पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पांढऱ्या ड्रेसमधले काही फोटो मलायकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर (photo on social media) केले आहेत. मलायकाचे हे फोटो सेलिब्रिटी स्टायलिस्ट तानिया घावरी हिनेही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मलायकाने हा ड्रेस वोग ब्यूटी अवॉर्ड २०१९ च्या निमित्ताने घातला होता. अभिनेत्रीचा हा हॉट अंदाज अनेकांना आवडला होता तर काहींनी त्यावर टीकाही केली होती.

मलायकाने हे फोटो जेव्हा सोशल मीडियावर (social media) शेअर केले तेव्हा नेटकऱ्यांनी तिला अनेक गोष्टी सुनावल्या होत्या. काहींनी तर मलायकाला कशा पद्धतीचे कपडे तिने घातले पाहिजेत याचा सल्लाही दिला होता. एका चाहत्याने लिहिले की, 'तू अंगप्रदर्शन होईल असे कपडे घालू नकोस. तू एक बाई आणि मुलाची आई आहेस. आपल्या शरीराचा आदर कर आणि कोणालाही काहीही बोलण्याची संधी देऊ नको. पुरुषांना या गोष्टींमध्ये रस असतो, ते अश्लिल कमेन्ट करतात, ते कधीही महिलांच्या शरीराचा आदर करत नाहीत. यातही काही लोक करतात आणि काही करत नाहीत.'

------------------------------

Must Readतब्बल दोन वर्षापूर्वी मलायकाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर (photo on social media)  केले होते. पण अजूनही या फोटोंची चर्चा थांबलेली दिसत नाही. मलायकाचे हे फोटो शेअर करताना स्टायलिस्ट तानियाने तिला सेक्सी अशी उपमाही दिली. मलायकाचा फिटनेस किती चांगला आहे याची तर तिच्या चाहत्यांनाही पूर्ण कल्पना आहे.