Date of 10th and 12th exams announcedऑनलाइन टिम :

महाराष्ट्र राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या (board) परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. दहावीची परीक्षा (Examination) 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होईल. बारावीची बोर्डाची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक देण्यात आलं आहे. या वर्षी कोविडमुळे (coronavirus) शालेय वर्ष उशीरा सुरू झालं आणि परीक्षाही लांबल्या. पुण्या-मुंबईत तर अद्याप शाळासुद्धा सुरू झालेल्या नाहीत. पण परीक्षांचं वेळापत्रक (Time Table) जाहीर झालं आहे.यंदाच्या वर्षी 12वीची परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू होईल तर 21 मे रोजी 12वीचा शेवटचा पेपर असेल, तर 10वीची परीक्षा 29 एप्रिल ते 29 मे या कालावधीमध्ये घेतली जाईल.

----------------------------

Must Read

------------------------------

 10 वीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि 12वी च्या परिक्षांचा (Examination) निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागणार आहे.मागच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे शाळा आणि कॉलेज सुरू झाली नव्हती, त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा उशीरा सुरू होणार आहेत. मार्च महिन्यापासूनच राज्यात कोरोनाने डोकं वर काढल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा (Students) भुगोलाचा पेपर झाला नव्हता, अखेर राज्य सरकारने हा पेपर रद्द करत विद्यार्थ्यांना सरासरी मार्क देण्याची घोषणा केली होती.कोरोनाची लागण झालेल्या किंवा क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.