lockdown in amravati


कोरोनाग्रस्तांची संख्या आणि रुग्णांच्या मृत्यूचा वाढता आलेख बघता, कोरोना नियंत्रणासाठी २२ फेब्रुवारीला रात्री ८ पासून आठवडाभर अमरावती महापालिका व अचलपूर नगर परिषद हद्दीत लॉकडाऊनची (lockdown) घोषणा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी येथे केली. जीवनावश्यक वस्तू यातून वगळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

नवीन वर्षात कोरोनाग्रस्तांची संख्या (corona cases) दिवसेंदिवस वाढतच आहे.  आतापर्यंत संक्रमितांची नोंद २९ हजार ३५७ झाली असून, ४६३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्याची भीती बाळगण्याऐवजी नागरिक बिनधास्त आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी आता सर्वाधिक प्रभावित अमरावती महापलिका व अचलपूर नगर परिषद हद्दीत २२ फेब्रुवारीच्या रात्री ८ पासून १ मार्च रोजी सकाळी ६ पर्यंत लॉकडाऊन राहील, असे पालकमंत्र्यांनी घोषित केले.  (health insurance)

-----------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

मात्र, जीवनावश्यक वस्तू, किराणा, औषधी, स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहतील. अमरावती व अचलपूर एमआयडीसीत ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याची यापूर्वी परवानगी दिली, ते सर्व उद्योगधंदे सुरू असतील.  आठवड्याचे लॉकडाऊन घोषित झाले असून, नागरिकांनी कोरोना नियमावलींचे पालन न केल्यास यात पुन्हा वाढ होऊ शकते, असे संकेत पालकमंत्री ठाकूर यांनी दिले. 

आठवडी बाजार भरण्यास मनाई

महापालिका क्षेत्रात, अचलपूर नगर परिषद हद्दीतील सर्व प्रकारच्या आठवडी बाजार भरण्यास लॉकडाऊनच्या (lockdown) काळात मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रपरिषदेत सांगितले.