kolhapur corona cases updates

राज्याच्या इतर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (corona cases) वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शासन, प्रशासन एकीकडे खबरदारी घेण्याचे आवाहन करत असताना शहरवासीय मात्र बिनधास्तच फिरत आहेत. ना तोंडावर मास्क, ना सामाजिक अंतर (social distancing) , तर अनेकांचे मास्क हनुवटीवरच असतात असे चित्र दिसते. कोरोनाबाबत बेफिकीर वागाल तर लॉकडाउन अटळ आहे, असे सांगण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे. 

भाउसिंगजी रोड, लक्ष्मीपुरी, छत्रपती शिवाजी चौक, करवीर नगर वाचन मंदिर ते बिंदू चौक, माळकर तिकटी, सीपीआर, करवीर तहसील चावडी, लुगडी ओळ, ताराबाई रोड, बाबू जमाल परिसर, गंगावेस, पापाची तिकटी, बाजारगेट, कुंभार गल्ली, सोमवार पेठ, न्यू शाहूपुरी, विचारेमाळ सदर बाजार, राजारामपुरी, राजेंद्रनगर परिसर, सुधाकर जोशी नगर झोपडपट्टी, गंजीमाळ, रंकाळा टॉवर परिसर, कसबा बावडा हा वर्दळीचा भाग आहे. आजही मुख्य रस्त्यावर फेरफटका मारला असता बहुतांशी लोकांच्या तोंडाला मास्क नव्हते. 

---------------------------------
Must Read

1) कोल्हापुरात रात्रीची संचारबंदी? वाचा काय म्हणाले पालकमंत्री सतेज पाटील

2) इचलकरंजीकरांसाठी आणखी एक चिंतेची बातमी...!!

3) बिनधास्त राहू नका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

---------------------------------

रस्त्याच्या बाजूला विनामास्क बिनधास्तपणे काहीजण गप्पांचे फड रंगवत बसलल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सकाळी तसेच सायंकाळी फिरायला येणाऱ्या मंडळी बेफिकीरी (social distancing) होती. कोरोनाचा विषाणू हा तोंडावाटे अथवा नाकावाटे जात असल्याने तोंडाला मास्क लावा असे वारंवार आवाहन केले जाते. सर्दी. ताप, अंगदुखी अशी प्राथमिक लक्षणे जाणवली तरी तातडीने उपचार घ्या असे सांगितले जात आहे. 

महापालिकेच्या स्तरावर कारवाई सुरू आहे. मात्र स्वतःहून लोक काळजी घेत नाहीत, तोपर्यत कोरोना कधी झपाट्याने पसरेल याचा नेम नाही असेही सांगितले जात आहे. कोरोना संपलाच असे गृहीत धरून काहीजण बिनधास्तपणे वावरत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच बेफिकीरी कायम राहिल्यास लॉकडाउनचे संकट दिले आहेत.