bank account moneyऑनलाइन टिम :

बँकेत व्यवहार करण्यासाठी पॅनकार्डप्रमाणेच (Pan Card) आधारकार्ड देखल खूप महत्त्वाचं आहे. यासाठी बँक खात्याशी आधारकार्ड लिंक (bank account) करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आधारकार्ड लिंक केलं नसलं तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने मागील काही काळापासून याला मुदतवाढ दिली होती. 31 मार्च 2021 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली असून आधारकार्ड (Aadhaar Card) लिंक न केल्यास तुमचं बँक खातं फ्रीज किंवा स्थगित केलं जाऊ शकतं. लवकर बँकेतील खात्याशी आधारकार्ड लिंक करून घ्या.

असं तपासा तपासा खातं लिंक आहे की नाही

-तपासण्यासाठी सर्वात आधी uidai.gov.in या वेबसाइट्वट जा.

-याठिकाणी Aadhaar Services या टॅबवर क्लिक करा.

-यानंतर Check Aadhaar & Bank Account Linking Status या पर्यायावर क्लिक करा

-याठिकाणी क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल

या ठिकाणी 12 अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे

-आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल

-ओटीपी टाकून तुम्हाला लॉगइन करावे लागेल

-ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचं बँक खातं आधारशी लिंक झालेलं असलं. याठिकाणी तुम्हाला Congratulations! Your Bank Aadhaar Mapping has been done असा मेसेज येईल.

----------------------------

ऑफलाइन पद्धतीने देखील करा लिंक

जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लिंक करू शकत नसाल तर बँकेत (bank account)  जाऊन देखील हे काम करू शकता. बँकेत जाऊन तुम्हाला आधारकार्डची कॉपी देणं गरजेचं आहे. याठिकाणी एक फॉर्म भरून दिल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला याची माहिती दिली जाईल. महत्त्वाचं म्हणजे आधारकार्ड वरील मोबाईल क्रमांक आणि बँकेतील मोबाईल क्रमांक एक असणं गरजेचं आहे. हे दोन्ही क्रमांक वेगवेगळे असल्यास हे काम होणार नाही.

या पद्धतीने ऑनलाईन करा लिंक

 -ऑनलाईन पद्धतीने लिंक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला इंटरनेट बँकिंगमध्ये लॉगइन करावं लागेल.

-या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक लिंक करण्यासाठी पर्याय दिसेल

-तुमचं खातं एसबीआयमध्ये असलं तर  www.onlinesbi.com या वेबसाईटवर जाऊन My Accounts या पर्यायामध्ये जाऊन  Link your Aadhaar number या पर्यायावर जा.

-इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे.

-त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकाचे शेवटचे दोन अंक दिसतील

-ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाइल क्रमांकावर मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला याबाबत तपशील मिळेल

मोबाईल क्रमांकावरून अशाप्रकारे तपासा

तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून *99*99*1# डायल करून तुमचा आधार क्रमांक टाका. सबमिटवर क्लिक केल्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही याबाबत माहिती मिळेल.