LG smartphone features


एलजीचा रोटेटिंग डिस्प्लेचा स्मार्टफोन LG Wing १० हजार रुपयांनी (lg smartphone) स्वस्त झाला आहे. या फोनची किंमत कपात करण्यात आल्यानंतर अॅमेझॉनवर या फोनची किंमत आता ५९ हजार ९९० रुपये झाली आहे. या फोनला गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये लाँच करण्यात आले होते. लाँच करताना या फोनची किंमत ६९ हजार ९९० रुपये होती. किंमत कमी झाल्यानंतर (smartphone features ) या फोनला कंपनीच्या वेबसाइटवरुन सुद्धा खरेदी करता येऊ शकते.

फोनचे फीचर्स (smartphone features ) 

ड्यूल स्क्रीनच्या या फोनमध्ये 1080x2440 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.८ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याशिवाय फोनमध्ये ३.९ इंचाचा एक सेकंडरी डिस्प्ले दिला आहे. जो 1080x1240 पिक्सल रेजॉलूशन सोबत येतो. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मेमरीच्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 765G चिपसेट दिला आहे.

------------------------------------

Must Read

1) हुपरीत आत्मदहनाचा प्रयत्न, घटनेचे चित्रीकरण करण्यावरून बाचाबाची

2) Nora Fatehi चा सेक्सी डान्स बघून आईने फेकून मारली चप्पल....

3) Gold Silver Price Today : सोने एवढे कसे महागले? वाचा आजचे दर

-------------------------------------

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलजी विंग मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. यात एलईडी फ्लॅश सोबत ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड गिंबल मोड कॅमेरा याचा समावेश आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये (lg smartphone) फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh ची बॅटरी दिली आहे. बॅटरी फास्ट चार्जिंग साठी यात क्विक चार्ज ४.० फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी दिली आहे. ओएस मध्ये हा फोन अँड्रॉयड १० ओएस वर बेस्ड कंपनीच्या कस्टमाइज्ड यूआय सोबत येते.