Petrol-diesel


ऑनलाइन टिम:

आसामच्या निवडणूक (Election) राज्यातील भाजपा सरकारने लोकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर ५ रूपये प्रती लिटर तर दारूचे भाव 25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील (state) नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी कोरोना (covid) संकटाच्या दरम्यान पेट्रोल डिझेल वर 5 रूपये प्रती लिटर सेस टॅक्स लावला होता. जो आता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यावर लोकांचे देखील मत सादर केले आहेत. 

------------------------------

Must Read

सरकारने दारूचे दर 25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आसाम राज्याचे वित्त मंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी दिली आहे. यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यात आसामसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक (Election) होणार आहे.आसाममध्ये भाजपचे सरकार आहे आणि यावेळी निवडणूक अत्यंत आव्हानात्मक मानली जात आहे. राज्यात 12 विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या नेतृत्वात युतीची स्थापना केली. यामुळे तेथे भाजपाची चुरशीची स्पर्धा होत आहे.