kolhapur accident newskolhapur- रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला पाठीमागून धडकल्याने बोरवडेचा मोटरसायकलस्वार जागीच (accident) ठार झाला. आज बिद्री साखर कारखान्याजवळ ही घटना घडली. संभाजी ऊर्फ बाबुराव ज्ञानदेव साठे (वय ६५) असे मृताचे नाव असून ते दूधसाखर विद्यानिकेतनचे निवृत्त कर्मचारी होते.

याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, संभाजी साठे यांच्या मुधाळ तिट्टानजीक असलेल्या कालव्याच्या शेजारील शेतात ऊसतोड सुरु आहे. त्यासाठी साठे हे शेताकडे आपली मोटरसायकल (क्र. एमएच ०९ – डी क्यू ९०५७) वरुन चालले होते. बिद्री साखर कारखान्यापासून पाचशे मीटर अंतरावर रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला त्यांच्या मोटरसायकलची पाठीमागून जोरात धडक बसली. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने ते जागीच ठार झाले.

स्थानिकांनी त्यांना मुरगूड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतू त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. घटनेची माहिती समजताच मुरगूड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा (accident) केला. ग्रामीण रुग्णालयात (hospital) शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी त्यांच्यावर बोरवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

संभाजी साठे हे बिद्रीच्या दूधसाखर विद्यानिकेतन या शाळेतून शिपाई म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. अधिक तपास सपोनि विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. प्रशांत गोजारे करत आहेत.