Robbed casecrime news- राचनवाडी (ता. चाकूर, जि. लातूर) येथील सुपारी घेऊन देवाच्या गाण्याचा कार्यक्रम करणाऱ्या ९ जणांना कोल्हापुरात एका व्यक्तीने जेवणात गुंगीचे औषध (numb medicine)घालून लुटले (Robbed) . लक्ष्मीपुरीतील गंजी गल्ली येथील यात्री निवासमध्ये की घटना घडली.

राचानवाडी येथील कुंताबई कवरे, द्रौपदा मल्हारी सूर्यवंशी, कमाबाई महादेव कांबळे, सखुबाई पिराजी सूर्यवंशी, मसाजी चिंचोले, अशोक अंकुश भोरे, मल्हारी सूर्यवंशी, लताबाई सूर्यवंशी आदींना एका व्यक्तीने देवाच्या गाण्यांचा कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांशी अज्ञात व्यक्तीने व्हाट्सअप च्या माध्यमातून संपर्क साधत कार्यक्रमाची सुपारी दिली. कार्यक्रमासाठी त्यांना अडीच हजार रुपये ऍडव्हान्स ही देण्यात आला होता. मंगळवारी कलाकार कोल्हापूर मध्ये आले. लक्ष्मीपुरी परिसरात गंजी गल्ली येथील एका खाजगी यात्री निवास मध्ये त्यांची राहण्याची सुविधा करण्यात आली.

-------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत तलवार व चाकूघेऊन फिरणार्‍यांना अटक

2) सांगली- सतत पैशांसाठी त्रास देत असल्याने केला खून

3) सांगली- मराठा नेत्यांना फिरू देणार नाही

-------------------------------------

बुधवारी सकाळी संबंधितांनी रूम खाली न केल्याने यात्री निवासचे मालक त्यांच्या रूममध्ये गेले. यावेळी त्यांना संबंधित कलाकार बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांनी याबाबतची माहिती तत्काळ लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात कळवली. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी यामधील काहीशा प्रमाणात शुद्धीत असणाऱ्या कलाकारांकडे चौकशी केली. 

यावेळी लुटीचा प्रकार समोर आला. जेवणामध्ये गुंगीचे औषध (numb medicine) घालून संबंधित कलाकारांना बेशुद्ध करण्यात आले. महिला व पुरुष असे एकूण नऊ कलाकारांच्या अंगावरील सोन्याचे दागिने संबंधितांने लंपास केले. तसेच संबंधित कलाकारांची मोबाइलही फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संबंधित कलाकारांना पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. कलाकार अजूनही धुंदीत असल्याने अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही.