harassments case against leader kolhapurlocal news- कोल्हापूर जिल्हा परिषदेतील महिला अधिकाऱ्याच्या गंभीर आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे पक्षप्रतोद आणि विरोधीपक्ष नेते विजय भोजे यांच्यावर महिलेने विनयभंगाचा (harassments)आरोप केला आहे. महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर विजय भोजे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur Zilla Parishad BJP leader Molestation accused)

कोल्हापूरमधील शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोजे यांनी आपल्याला घरी बोलावून विनयभंग केल्याचा दावा महिलेने तक्रारीत (harassmentsकेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

-------------------------------

Must Read

1) अभिमानास्पद !!! इचलकरंजीच्या कन्येने पटकावला देशात प्रथम क्रमांक

2) अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात वाद पेटला

3) दहावी- बारावीच्या विध्यार्थ्यांसाठी परीक्षेआधीच खुशखबर !!!!

-------------------------------

दरम्यान, विजय भोजे यांनी मात्र आपल्यावरील विनयभंगाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. मॅट घोटाळा बाहेर काढल्याचा रागातून आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा दावा त्यांनी केला आहे. विनयभंगाचे खोटे आरोप करुन गुन्हा दाखल केल्याचा दावा विजय भोजेंनी केला आहे.विजय भोजे यांच्या समर्थनार्थ सत्ताधारी आणि विरोधी सदस्य आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेत या प्रकरणावरुन घमासान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.