encroachment in real estatelocal news- अरुंद रस्ते, अनधिकृत फेरीवाल्यांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. फूटपाथवरही टपर्‍या थाटल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम महापालिकेने आखली आहे.  आजपासून 100 कर्मचारी आणि यंत्रणेसह ही मोहीम (encroachment in real estate) सुरू करण्याची योजना आहे. 

याबाबत दुपारी महापालिकेत बैठकीनंतरच मोहीम सुरू केली जाणार आहे. शिवाजी चौकात सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.संपूर्ण शहरात अतिक्रमण वाढले आहे. फूटपाथ अवैध व्यावसायिकांनी व्यापले आहेत. त्यामुळे महापालिकेने संपूर्ण शहरात एकाच वेळी धडक मोहीम हाती घेण्याचे नियोजन केले आहे.

---------------------------------

Must Read

1) आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली आज भव्य मोटरसायकल रॅलीचा प्रारंभ

2) ...अन्यथा कोल्हापूरचा वणवा राज्यभर पेटेल

3) Propose Day : प्रपोज करण्यासाठी 'हे' फंडे वापराल तर नकाराचं टेंशन विसराल....

---------------------------------


कळंबा ते मिरजकर तिकटी, फुलेवाडी नाका ते रंकाळा स्टँड, तावडे हॉटेल ते शिवाजी पूल, राजाराम कारखाना ते भवानी मंडप, कसबा बावडा भगवा चौक ते शिवाजी विद्यापीठ अशा पहिल्या टप्प्यात मोठे आणि महत्त्वाचे रस्ते अतिक्रमणमुक्‍त केले जाणार असल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.


100 कर्मचारी तैनात


अतिक्रमण मोहिमेसाठी (encroachment in real estate100 कर्मचारी आणि पोलिस, चार डंपर, ट्रॅक्टर ट्रॉली, गॅस कटर तसेच रस्त्यावर अनेक दिवसांपासून पार्किंग करून ठेवलेली वाहने उचलण्यासाठी शहर पोलिस वाहतूक शाखेची क्रेन अशी यंत्रणा सज्ज असल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख पंडित पवार यांनी सांगितले.


धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये आदी परिसरातील 100 मीटर अंतरावरील सर्व अतिक्रमणे हटविले जाणार आहेत. हा सर्व परिसर अतिक्रमणमुक्‍त केला जाणार असल्याची माहितीही पवार यांनी दिली.