coronavirus restriction in kolhapurcorona news today- राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता आहे. जिल्ह्यातही कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे यापूर्वी घातलेल्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी (restrictions) करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सायंकाळी पोलिस प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले. या निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.

खासगी डॉक्टरांकडे तपासणीसाठी आलेल्या रुग्णाला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असल्यास त्याची कोरोना तपासणी करणे अनिवार्य राहील, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी या आदेशात म्हटले आहे.जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात यापूर्वी लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत 28 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत वाढवली आहे. या कालावधीत यापूर्वी लागू केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

-----------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

राजकीय सभा, मोर्चे, आंदोलने, मिरवणुका, संमेलन तसेच सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजनास बंदी घालण्यात आली आहे. हे कार्यक्रम बंदिस्त जागेत असतील तर त्याच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच प्रवेश देता येईल. मात्र त्यासाठी पोलिस व स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार (restrictions) आहे.

विवाह समारंभास 50 लोकांना तसेच अंत्यविधीच्या कार्यास जास्तीत जास्त 20 व्यक्तींना उपस्थित राहता येणार आहे. बंदिस्त सभागृहात होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमास क्षमतेच्या 50 टक्के प्रवेश राहील. त्यापेक्षा जास्त व्यक्ती असतील तसेच विवाहासाठी 50 पेक्षा अधिक लोक उपस्थित असतील तर संबंधित आयोजक व सभागृहाचे व्यवस्थापक यांच्यावर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करावी; प्रसंगी ती कार्यालये सील करावी, असेही जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस सुरू राहणार आहेत. मात्र, या ठिकाणी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्यक राहणार आहे. त्याचे पालन झाले नाही तर संस्था प्रमुख, व्यवस्थापकांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाणार आहे. या तपासणीसाठी पथके नेमण्याचेही आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना तसेच पोलिसांना दिले आहेत.

हॉटेल, बार, रेस्टॉरंट सुरू राहणार आहेत. मात्र त्याच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांसहच ते सुरू ठेवता येणार आहेत. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिसांनी संबंधितांना एक नोटीस द्यावी, त्यानंतर त्याचे पालन झाले नाही तर संबंधितांचे परवाने रद्द करा, असे आदेशही देण्यात आले आहेत.

'नो मास्क - नो एन्ट्री' ही मोहीम सर्व दुकानदार, व्यापारी, शासकीय, निमशासकीय कार्यालयांत राबविली जाणार असून त्याचीही प्रभावी अंमलबजावणी करावी. प्रत्येकाने आपल्या दुकाने, कार्यालयाच्या दर्शनी भागावर तसे फलक लावावेत, याची अंमलबजवाणी व्हावी याकरिता पोलिस, स्थानिक नागरी संस्थांनी तपासणी मोहीम राबवावी, असेही जिल्हाधिकार्‍यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. (corona news today)

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, दुचाकी, ऑटो रिक्षा, प्रवासी बसेसमधील प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक राहील. त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आठवडी बाजार सुरू राहतील. मात्र, त्या ठिकाणीही सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करावा लागणार आहे.

धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे खुली राहतील. मात्र सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करावा लागणार आहे. यात्रा, उत्सव, उरूस याला मात्र बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक विधी, पूजा कमीत मानकरी, पुजारी, भाविक यांच्या उपस्थितीत करता येईल. याचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाणार आहे.

यावर असेल बंदी

  • राजकीय सभा, मोर्चे, मिरवणुका, संमेलने, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम.
  • यात्रा, उत्सव, उरूस
  • 50 व्यक्तींपेक्षा जादा उपस्थितीत होणारे विवाह सोहळे
  • हे असेल सुरू
  • प्रार्थना, धार्मिक स्थळे, शाळा-महाविद्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट, बार, खासगी आस्थापना, दुकाने.
  • आठवडी बाजार, सार्वजनिक वाहतूक, ऐतिहासिक स्थळे, संग्रहालये, बंदिस्त सभागृहात होणारे कार्यक्रम