electricity billवीज बिल (electricity bill) भरणार नाही कृती समिती'च्या वतीने रविवारी सायंकाळी मिरजकर तिकटी येथे 'महावितरण'ने वीज ग्राहकांना बिल भरण्यासंदर्भात पाठविलेल्या नोटिसांची होळी करण्यात आली. 'महावितरण'ने जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा कोल्हापुरातून पेटलेला वणवा राज्यभर भडकेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांचे वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी 'वीज बिल भरणार नाही कृती समिती'तर्फे पाच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, महावितरणने ग्राहकांना नोटिसा पाठविल्या असून 15 दिवसांत वीज बिल भरावे, अन्यथा पुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला आहे.


याचा निषेध म्हणून कृती समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी मिरजकर तिकटी येथे नोटिसांची होळी करण्यात आली. 'ऊर्जामंत्री हटाव, वीज बिल भरणार नाही...' अशा घोषणा देण्यात आल्या.


निवास साळोखे म्हणाले, महावितरणने बिल (electricity bill) नोटीस पाठवून दहशत निर्माण केली आहे. वीज तोडण्यास आल्यानंतर घाबरू नका, काहीही झाले तरी वीज बिल भरू नका. महावितरणला कोल्हापुरी हिसका दाखविण्यास जनता सक्षम आहे. अ‍ॅड. बाबा इंदुलकर म्हणाले, कोल्हापूरचे नागरिक आग आहेत. महावितरण, राज्य सरकारने त्यांच्याशी खेळू नये.

------------------------------------

Must Read


1) अन्यथा तुमचे तुणतुणे बंद करू, राजू शेट्टी यांनी दिला इशारा


2) सनी लिओनीवर दाखल झाला गुन्हा.....!!!


3) सरकारने शेतकऱ्यांविरोधात सेलिब्रिटींना उतरवले


------------------------------------


एकही वीज कनेक्शन तोडू दिले जाणार नाही. बाबा पार्टे म्हणाले, महावितरण नोटिसीची होळी करून थांबणार नाही. महावितरणचे कर्मचारी वीज कनेक्शन तोडण्यास आल्यावर हाकलून लावा. यावेळी बाबासाहेब पाटील-भुयेकर, विजयसिंह पाटील, जयकुमार शिंदे, रजनी कदम, सुधा सरनाईक, सुवर्णा मिठारी आदी उपस्थित होते.


साडी-चोळीचा आहेर देणार


महावितरण कंपनीने कोल्हापुरातील महिलांच्या संयमाचा अंत पाहू नये. वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍यांना साडी-चोळीचा आहेर देण्याचा इशारा राजमाता जिजाऊ बि—गेडच्या वतीने देण्यात आला.