fixed deposit


मुदत ठेवी (fixed deposit - FD) हा निश्चित उत्पन्न मिळण्याचा एक चांगला मार्ग आहे; मात्र कोरोना लॉकडाउनच्या काळात सगळीच परिस्थिती बिघडल्यामुळे एफडीवरील व्याजदरांनी (Interest Rate) खालची पातळी गाठली. त्यातही काही कारणांनी एफडी मॅच्युरिटीअगोदर (Maturity) मोडायची वेळ आली, तर अधिक नुकसान होतं. कारण अशा परिस्थितीत दंड भरावा लागतो. मग नुकसान टाळण्यासाठी काय करायचं, याचे काही मार्ग पाहू या.

बँकेच्या मुदत ठेवींची मुदत सात दिवसांपासून सुरू होते आणि ती अगदी 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीतही उपलब्ध असते. मुदत ठेवीमध्ये मुद्दल एका निश्चित व्याजदराने गुंतवली जाते. गुंतवणूकदाराला (investor)त्या रकमेवर वाढत जाणारे व्याज मिळतं.

एफडी (fixed deposit) मुदतीआधी मोडायची झाली, तर मात्र दंडाची रक्कम (Penalty) भरल्याशिवाय मोडता येत नाही. तसंच, आपली त्या वेळची गरज भागल्यानंतर हातात आलेली रक्कम पुन्हा गुंतवायची असेल, तर तेव्हा व्याजदार कमी झालेला असण्याची शक्यता असते. एफडीवर मिळणारा व्याजदर (Interest Rate)  हा त्या मुदतीपुरताच मर्यादित असतो. या पार्श्वभूमीवर, एफडीमध्ये गुंतवणूक करताना काही वेगळं धोरण अवलंबणं आवश्यक आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसने त्याबाबतची माहिती दिली आहे.

-------------------------------

Must Read

1)कबनूर परिसरातील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

2)UPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

3)सांगली मुकादमकडून ८ लाखाला गडा

--------------------------------

हे आहेत काही मार्ग -

मुदतीआधी एफडी मोडण्याची वेळ आली, तर ती मोडण्याऐवजी एफडीच्या अगेन्स्ट कर्ज (Loan Against FD) घ्यायचा पर्याय स्वीकारावा. अनेक बँका त्यांच्या एफडीवर कर्ज घेण्याचा पर्याय देतात. एफडीवर घेतलेल्या कर्जाचा व्याजदर साधारणपणे त्या एफडीवरील व्याजदराच्या एक ते दोन टक्के अधिक असतो. अर्थात बँकेनुसार तो वेगवेगळा असतो. पर्सनल लोन घेण्यापेक्षा गुंतवणूकदाराला एफडीवरील कर्जाचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण एफडीवरील कर्जाचे व्याजदर पर्सनल लोनच्या व्याजदरापेक्षा साधारणतः कमी असतात. कारण त्यांना ठेवींची सुरक्षितता असते.

गुंतवणूकदार स्वीप-इन (Sweep In)एफडी अकाउंटचा पर्यायही वापरू शकतात. स्वीप-इन अकाउंट्सना टू इन वन अकाउंट किंवा मनी मल्टिप्लायर अकाउंट असंही म्हणतात. कारण त्यातून बचत खात्याच्या तरलतेचा लाभ तर मिळतोच, शिवाय एफडीचा व्याजदरही मिळतो. स्वीप इन एफडी अकाउंटचे व्याजदर रेग्युलर एफडीसारखेच असतात, शिवाय गुंतवणूकदारांना बचत खात्याच्या लिक्विडिटीचा लाभही घेता येतो. स्वीप इन अकाउंटमधील निधी वापरण्यासाठी किंवा मुदतीआधी काढून घेण्यासाठी दंड आकारला जात नाही.