sushant singh rajputऑनलाइन टीम- 

entertainment center- भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच खेसारी लालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो या इंडस्ट्रीमधील लोकं मला सुशांत सिंह राजपूत बनवू इच्छितात असे बोलताना दिसत आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ (facebook video) चर्चेत आहे.

खेसारी लालने नुकताच फेसबुक लाइव्ह केले होते. त्याने भोजपुरी इंडस्ट्रीमधील कोणाचेही नाव न घेता इंडस्ट्रीमधील लोकांवर निशाणा साधला असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान तो भावुक झाल्याचे देखील दिसत आहे.

------------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

‘मला असे वाटते भोजपूरी इंडस्ट्रीमधील लोकं मला दुसरा सुशांत सिंह राजपूत बनवू इच्छितात. जितकं प्रेम सुशांतला बॉलिवूडमध्ये मिळाले होते तसेच काहीसे आणि तितकंच प्रेम मला भोजपूरी इंडस्ट्रीतून मिळत आहे. पण मी इतका कमजोर नाही कारण प्रेक्षकांचे माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. माहिती नाही लोकांना माझ्यामुळे काय त्रास होत आहे?’ असे खेसारी लाल व्हिडीओमध्ये (facebook video) बोलताना दिसत आहे.

पुढे तो म्हणाला, ‘मी २०११ साली इंडस्ट्रीमध्ये आलो. लोकांना ते आवडले नाही. बहुतेक माझे चित्रपट हिट ठरतात, मी समाजसेवा करतो त्यामुळे त्यांना मी आवडत नाही. लोकांना वाटत आहे मी देखील सुशांत सिंह राजपूतसारखे टोकाचे पाऊल उचलेन, पण मी असे काही करणार नाही. मला विरोध करणाऱ्या लोकांकडे पैसे खूप आहेत पण त्या पैशाने ते केवळ वस्तू खरेदी करु शकतात, सम्मान नाही. माझ्यासोबत जनता आहे, त्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमामुळे मी इंडस्ट्रीमध्ये टिकलो आहे. माझ्यासाठी चाहते संपूर्ण बिहार बंद करु शकतात. त्यामुळे अशा लोकांचा माझ्यावर काही परिणाम होत नाही.’