cricketers


अभिनेत्री कंगना रणौतची शेतकरी आंदोलनाबद्दलची (farmer protest) वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुचं आहे. कंगना रणौतच्या निशाण्यावर सध्या क्रिकेटर्स आले आहेत. कंगनानं क्रिकेटपटू रोहित शर्माच्या ट्विटरवरुन (twitter) क्रिकेट खेळाडूंवर निशाणा साधला आहे. “हे सर्व क्रिकेट खेळाडू  (cricketers) धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत?”, अशी टीका केलीय. शेतकरी त्यांच्याच भल्यासाठी करण्यात आलेल्या कृषी कायद्यांना विरोध का करत आहेत?, असा सवाल कंगना रणौतनं विचारला आहे. 

शेतकरी दहशतवादी असल्याचा कंगनाचा पुनरुच्चार

कंगना रणौतनं “हे सर्व क्रिकेट खेळाडू (cricketers) धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत” असा सवाल उपस्थित केला. याचवेळी तिन पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केल.”ते दहशतवादी आहेत त्यांच्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांची भीती वाटते हे सांगून टाका, असं आव्हान कंगनानं क्रिकेटर्सना दिलं आहे.


--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

रोहित शर्माचं ट्विटभारत हा एकसंध असून आपण सर्वजण मिळून समस्येवर मार्ग काढणं ही काळाची गरज आहे. आपल्या शेतकऱ्यांचा देशाच्या विकासात महत्वाचा वाटा आहे. देशाच्या भल्यासाठी सर्वजण एकत्रित येऊन त्यांची जबाबदारी पार पाडतील, असं ट्विट (twitter)  रोहित शर्मा यानं केलं होते.