john abrahimऑनलाइन टिम :

entertainment center- अभिनेता जॉन अब्राहम सध्या Attack या सिनेमाचं शूटींग करत आहे. या शुटींग दरम्यान जॉनला दुखापत झाली आहे. स्वत: जॉनने सोशल मीडियावर एक फोटो आणि व्हिडीओ (video viral on internet) शेअर करत त्याला झालेल्या दुखापतीची माहिती दिली.

मुंबईमध्ये जॉनच्या ‘अटॅक’ या सिनेमाचं चित्रीकरण सुरु असताना त्याला दुखापत झाली. एका अॅक्शन सिनचा फोटो जॉनने सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या सिनमध्ये जॉनच्या पाठीवर काचेची ट्यूबलाईट फोडण्यात आली. यावेळी काचेचे काही तुकडे जॉनच्या चेहऱ्याला लागले (video viral on internet) आणि रक्त येऊ लागलं. (entertainment center)

--------------------------


जॉन अब्राहमने एक व्हिडीओ देखील पोस्ट केलाय. या व्हिडीओत मेकअप आर्टिस्ट जॉनच्या चेहऱ्यावरील रक्त पुसत आहेत. हा लाल रंग नसून हे रक्त असल्याचं ते जॉनच्या चाहत्यांना सांगत आहेत. अटॅक’ या सिनेमात जॉनसोबत जॅकलीन फर्नानडीस आणि रकुल प्रित सिंग या दोघी झळकणार आहेत.जॉनच्या या फोटोवर अभिनेता टायगर श्रॉफ यानं ‘अॅक्शन मॅन’ अशी कमेंट केली आहे.धूम,सत्यमेव जयते, फोर्स, मद्रास कॅफे अशा अनेक अॅक्शन सिनेमांमध्ये जॉनने मुख्य भूमिका साकारल्या आहेत.