RBI


recruitment- रिझर्व्ह बँकेत (RBI)  नोकरी करण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे. आरबीआयमध्ये (सिव्हिल) आणि ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) या पदासाठी 48 जागांसाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी नोटिफिकेशनही जारी करण्यात आले आहेत.

आरबीआयमध्ये नोकरी मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईट rbi.org.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क यांसह महत्त्वाच्या तारखा काय असेल याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

-------------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत तलवार व चाकूघेऊन फिरणार्‍यांना अटक

2) सांगली- सतत पैशांसाठी त्रास देत असल्याने केला खून

3) सांगली- मराठा नेत्यांना फिरू देणार नाही

-------------------------------------

शैक्षणिक पात्रता :

उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 65 टक्के गुणांसह सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा किमान 55 टक्के गुणांसह सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंगची (engineering) पदवी असणे गरजेचे आहे. याशिवाय किमान 2 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा :

ज्युनिअर इंजिनिअर (recruitment) पदासाठी उमेदवाराचे कमाल वय 30 वर्षे असावे. तर SC/ST वर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत सूट दिली गेली आहे.

अर्ज शुल्क :

आरबीआय ज्युनिअर इंजिनिअर भरतीसाठी जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, जनरल आणि ओबीसी वर्गासाठी उमेदवारांना 450 रुपये अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे. तर SC/ST/PWD कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 50 रुपये प्रवेश शुल्क असेल.

या आहेत महत्वाच्या तारखा :

ऑनलाईन अर्ज – 2 फेब्रुवारी, 2021

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी, 2021

शुल्क जमा करण्याची तारीख – 15 फेब्रुवारी, 2021

लेखी परीक्षेची अंदाजे तारीख – 8 मार्च, 2021