indian politics- jayant patil on congress DCMindian politics - राज्यात महाविकास आघाडी स्थापन करताना पदवाटपाबाबत तिन्ही पक्षांची सर्वच विषयांवर चर्चा झाली आहे. त्यात उपमुख्यमंत्री पदाचा देखील समावेश होता. त्यानुसार विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे (politics party of india) गेले होते. सध्या नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने ते पद रिक्त झाले आहे. त्यामुळे यावर आघाडीतील घटक पक्ष एकत्र येऊन चर्चा करतील. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी (politics party of indiaपरिवार संवाद कार्यक्रमानिमित्त ते यवतमावळ दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.पाटील म्हणाले की, भाजपच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती अडचणीची झाली आहे. हजारो कोटी रुपये थकले आहेत. कोरोनाच्या काळातील वीजबिलाचा मुद्दा आहे. (indian politics)

-------------------------------

Must Read

1)कबनूर परिसरातील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

2)UPSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

3)सांगली मुकादमकडून ८ लाखाला गडा

--------------------------------

थकबाकीमुळे महावितरणची स्थिती अडचणीची झाली आहे. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही पाटील म्हणाले. मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी सुरू होत आहे. त्यात राज्य सरकारने आपली भूमिका मांडली आहे. कोणत्याही समाजाचे हक्काचे आरक्षण शासन कमी करणार नसल्याचेही ते म्हणाले. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकरणकर, निरीक्षक किशोर माथनकर, माजी आमदार संदीप बाजोरीया उपस्थित होते.