इचलकरंजी येथील पंचगगा नदीपात्र (water pollution) पुन्हा एकदा जलपर्णीने व्यापले आहे. नदी घाट परिसरातही जलपर्णी मोठ्या प्रमाणात साचली आहे. त्याचा धोका जलचरांना निर्माण झाला आहे. 

अनेक दिवसांपासून पंचगंगा नदीतील पाणी प्रवाह थांबला होता. त्यामुळे पाण्यात शेवाळाचे प्रमाण वाढले होते. परिणामी पाण्याचा हिरवट रंग आला होता. तसेच पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा योजनेचा एक उपसा पंप बंद पडला होता.

या पार्श्‍वभूमीवर पालिकेने पंचगंगा नदी प्रवाहित करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार तीन दिवसांपूर्वी धरणातून पंचगंगा नदीमध्ये पाणी सोडले आहे. या पाण्याच्या प्रवाहाबरोबर जलपर्णी वाहत आली आहे. ही सर्व जलपर्णी पंचगंगा बंधारा आणि नदीघाट परिसरात साचून राहिली आहे. त्यामुळे संपूर्ण घाट परिसर जलपर्णीने व्यापून गेला आहे. 

----------------------------------
Must Read

1) पुन्हा लॉकडाऊनची छाया; मुख्यमंत्र्यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

2) आजपासून आठवडाभर ‘लॉकडाऊन’

3) राज्यात २४ तासांत "इतके" करोनाबाधित वाढले

------------------------------------

शहरातील अनेक नागरिक दररोज पहाटे नदीमध्ये पोहण्यासाठी जातात. त्यांनाही या जलपर्णीचा (water pollution) अडथळा निर्माण झाला आहे. तसेच कपडे धुण्यासाठी दररोज नागरिक मोठ्या प्रमाणात तेथे येतात. त्यांनी नदीघाटाच्या काठानजीक असलेल्या जलपर्णीचा अडथळा दूर केला आहे. ही जलपर्णी काढून घाटावरच टाकली आहे. 

नदीच्या पाणीपातळीत वाढ 

यापूर्वी जेसीबीच्या साहाय्याने अनेकवेळा पालिकेसह सामाजिक संस्थांनी जलपर्णी हटवली होती. आता पुन्हा एकदा जलपर्णीचे संकट आले आहे. सध्या नदीपात्रातील पाण्याचा पातळी वाढली आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत ही जलपर्णी पुढे वाहत न गेल्यास जलचरांना धोका होण्याची शक्‍यता दिसत आहे.