molestationcrime news- देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (gang rape) करून तिच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची दगडकाठ्यांनी मारहाण करत अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या  (murder) करण्यात आली. तसेच तिच्या कुटुंबीयांची देखील हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. 

कोरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेमरू पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गढुपरोदा गावात ही घटना घडली. 29 जानेवारी घडलेल्या या घटनेची माहिती मंगळवारी समोर आली. त्यानंतर या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. संतराम मझवार (45), अब्दुल जब्बार (29), अनिल कुमार सारथी (20), परदेसी राम पनिका (35), आनंद राम पनिका (25) आणि उमाशंकर यादव (21) अशी आरोपींची नावं आहेत. हे सर्व आरोपी सतरेंगा गावचे रहिवासी आहेत. (crime news)

--------------------------------
Must Read

1) आरोपावर धनंजय मुंडेंचा खुलासा, म्हणाले…

2) ग्राहकांना झटका! बजेट 2021 नंतर 25 रुपयांनी वधारल्या गॅसच्या किंमती

3) SBI मध्ये खातं असेल तर KYC साठी ही कागदपत्र आवश्यक

--------------------------------

प्राथमिक माहितीनुसार, मझवार 29 जानेवारी रोजी 16 वर्षीय मुलगी, तिचे वडील आणि त्यांची चार वर्षांची नात यांना मोटारसायकलवर त्यांच्या घरी सोडण्यासाठी निघाला होता. मात्र रस्त्यातच त्याने कोरइ गावाजवळ थांबून मद्य प्राशन केलं. त्याला इतर आरोपींचीही सोबत मिळाली. त्यानंतर आरोपींनी तीनही पीडित व्यक्तींना गढुपरोदाजवळच्याच जंगलात नेलं. मझवार आणि इतर आरोपींनी 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार (gang rape) केला. त्यानंतर तिघांवरही दगड-काठ्यांनी हल्ला करत त्यांना जंगलात फेकून दिलं आणि घटनास्थळावरून ते पसार झाले.