Jitendra AwhadPolitical News-बरनाथ बदलापूरमधील पाण्याचा प्रश्न किती उग्र आहे, येथील महिलांना त्याची पूर्ण कल्पना आहे. आपले ठाण्याचे खासदार कधी आले इकडे, कुणी सांगेल का? असा प्रश्न विचारत आव्हाड यांनी ठाण्यातील शिवसेना नेत्यांवर नाव न घेता टीका केली. तसेच, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन केंद्र सरकारवरही टीका केली, पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन (petrol diesel price) एकेकाळी ज्येष्ठ कलावंतापासून ते अनेकांनी काँग्रेस व डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती. पण, आज सगळे चडीचूप आहेत. भाजपासरकारमध्ये एकाधिकारशाही असल्याचे सांगत हे सरकार (Political) आरक्षणविरोधी असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.  

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाणे आणि नवी मुंबईतील जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम आणि उद्घाटन सोहळ्यांना हजेरी लावली. यावेळी, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते. अंबरनाथ-बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात आव्हाड बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपाने 2012 पासून 2014 पर्यंत पेट्रोल दरवाढीवरुन कायम टीका केली, त्यावेळी स्मृती इराणी सर्वात पुढे होत्या, असे म्हणत हम करे सो कायदा या विचाराने हे सरकार चालू असल्याचं सांगितलं. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही आंदोलनजीवी शब्दावरुन आव्हाड यांनी टीका केली. 

-----------------------------

Must Read

1) पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू

2) IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?

3) आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात..!

------------------------------

गुरुदासपूरच्या निवडणुकीचा (Political) वृत्तांत सांगताना भाजपाचा तेथील पराभव हे वेगळेच संकेत असल्याचेही आव्हाड यांनी म्हटलं. आपल्यावर श्रेष्ठ नाटककार नरेंद्र मोदी हे भुलभुलैया करण्याचं काम करतात, मोदी सरकारने (Modi government) देशाच्या मालकीच्या कंपन्या विकण्याचा धडाकाचा लावलाय, येणाऱ्या काळात भाजप सरकार आरक्षण काढेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हळूच बाजूला सारेल, असं माझं स्पष्ट मत आहे, असेही आव्हाड यांनी म्हटलं. ज्या संविधानामध्ये (constitution) आपल्याला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलाय, त्याचं संविधानातील अधिकार काढण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. आंदोलनजीवी को रोखना होगा, याचा अर्थ काय? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.