IPL AuctionIPL Auction- हरभजन सिंग- 2020 मध्ये हरभजन काही वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल खेळू शकला नव्हता. त्याचा चेन्नईबरोबरचा करारही यावर्षी संपला आहे. आयपीएल 2021 लिलावासाठी त्याने त्याचे बेस प्राइस 2 कोटी निश्चित केली आहे. जर एखाद्या फ्रेंचायझीने त्याला संघात घेतलं नाही तर त्याच्याकडे निवृत्तीशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही

पीयूष चावला- सीएसकेने 2019 मध्ये पीयूषला 6.75 कोटी रुपयात खरेदी केलं होतं, मात्र 2020 मध्ये त्याने विशेष खेळी केली नाही. 7 सामन्यात त्याने अवघ्या 6 विकेट्स घेतल्या होत्या. अशामुळे त्याच्यावर बोली लागणं गरजेचं आहे, अन्यथा त्यालाही निवृत्तीचा विचार करावा लागेल.

स्टुअर्ट बिन्नी- एक ऑलराउंडर म्हणून स्टुअर्ट आयपीएलमध्ये त्याची कमाल दाखवू शकला नाही आहे. त्याने आतापर्यंत IPL चे 95 सामने खेळले असून त्याने 880 रन्स आणि 22 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने भारतासाठी शेवटची मॅच 2016 मध्ये खेळली होती.

----------------------------

मोहित शर्मा- गेल्यावर्षी दिल्लीकडून खेळलेल्या या खेळाडूला विशेष संधी मिळाली नव्हती. आयपीएलमध्ये 2013 मध्ये डेब्यू करणाऱ्या या खेळाडूने आतापर्यंत 86 सामने खेळले असून यात त्याने 92 विकेट्स घेतल्या आहेत. भारतासाठी त्याने 2015 नंतर एकही मॅच खेळली नाही आहे. त्यामुळे एकाही संघाने बोली न लावल्यास या खेळाडूसमोर निवृत्तीचा पर्याय शिल्लक राहील.

रॉबिन उथप्पा- राजस्थान रॉयल्सने गेल्यावर्षी उथप्पाला 3 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. त्याने UAE मध्ये झालेल्या गेल्यावर्षीच्या हंगामात 12 सामन्यात केवळ 196 रन्स केल्या होत्या. यावर्षी तो चेन्नईकडून खेळू शकतो. चेन्नईकडून त्याने विशेष प्रदर्शन केले नाही तर त्याला निवृत्ती घ्यावी लागू शकतो.