Sports news- इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) साठी खेळाडूंचा लिलाव हा गुरुवारी चेन्नईत होणार आहे. या लिलावात कोणती टीम कोणते खेळाडू खरेदी करणार याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. सर्वच टीम नव्या दमानं नव्या सीझनमध्ये खेळण्यासाठी या लिलावात खास योजना (ipl auction)तयार करुन उतरणार आहेत.
या वर्षी होणाऱ्या सिझनपूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) च्या टीमनं आपलं नाव बदललं आहे. या सिझनपासून या टीमचं नाव पंजाब किंग्स (Punjab Kings) असेल. पहिल्या सीझनपासून खेळत असूनही एकदाही आयपीएल न जिंकणाऱ्या तीन टीममध्ये प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) या टीमचा समावेश आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बऱ्याच काळापासून या टीमचं नाव बदलण्यावर विचार सुरू होता. बुधवारी एका कार्यक्रमात नव्या नावाची आणि नव्या लोगोची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
Must Read
1) आजचे राशीभाविष सोमवार,15 फेब्रुवारी २०२१..!!
2) इचलकरंजीचे श्रीमंत घोरपडे नाट्यगृह दुरवस्थेत..!!
3) धावत्या रेल्वेत ओळखीच्या व्यक्तीनेच केला मुलीवर अत्याचार..!!
पंजबाकडं आहेत सर्वात जास्त पैसे!
आजवर फक्त एकदाच स्पर्धेची फायनल गाठलेल्या पंजाबच्या टीमकडं या आयपीएल लिलावासाठी (ipl auction) सर्वात जास्त पैसे आहेत. चेन्नईमध्ये होणाऱ्या लिलावात पंजाबचं मॅनेजमेंट 53.20 कोटी रुपयांसह उतरेल. यानंतर रॉयल चँलेंजर्स बंगळुरुकडं (RCB) 35.90 कोटी रुपये आहेत. तर राजस्थान रॉयल्यकडं 34.85 कोटी आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाबनं या आयपीएलपूर्वी ग्लेन मॅक्सवेलसह नऊ खेळाडूंना सोडले आहे. टीमचे हेड कोच आणि भारतीय टीमचे माजी कॅप्टन अनिल कुंबळे या लिलावात मजबूत टीम बनवण्यासाठी चांगल्या खेळाडूंना खरेदी करण्याचा प्रयत्न करतील.
पंजाबने कायम ठेवलेले खेळाडू : केएल राहुल, क्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंह, सरफराज खान, दीपक हुड्डा, प्रभसिमरन सिंग, मोहम्मद शमी, क्रिस जॉर्डन, दर्शन नलकांदे, रवी बिष्णोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार, इशान पोरेल
पंजाबने सोडलेले खेळाडू : ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कॉटरेल, करुण नायर, हार्डस विलॉइन, जगदीश सुचित, मुजीब उर रहमान, जिमी नीशाम, कृष्णा गौतम, तेजिन्दर सिंग