mumbai indiansऑनलाइन टिम :

sports news- मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)  या गतविजेत्या संघाला लिलावाआधीच एक मोठा धक्का बसला आहे. लिलावासाठी काही मिनिटं शिल्लक असताना मुंबईच्या स्टार खेळाडूने मानसिक स्वास्थ बिघडल्यामुळे T-20 स्पर्धेतून ब्रेक घेतल्याचं समजत आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्ससमोर संघाच समतोल राखण्याच मोठ संकट उभ राहील आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डीकॉकने (Quinton de Kock )  यावेळी मानसिक स्वास्थ बिघडल्यामुळे एक ब्रेक घेतल्याचे ठरवलं आहे. डीकॉकला यावेळी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे आता किती दिवस T-20 स्पर्धेतून ब्रेक घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ब्रेक घेतल्यामुळे डीकॉक स्थानिक T-20 सामन्यात खेळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे पण आयपीएल ( IPL) मध्ये खेळण्याबाबत अजुनही साशंकता आहे.

----------------------------

यावेळी आयपीएल भारतात खेळवली जाण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यामध्ये बायो-बबल देखील असणार आहे. या गोष्टीचा त्रास डीकॉकला पुन्हा होऊ शकतो अशी भीती डॉक्टरांना आहे त्यामुळे अजुनही आयपीएल मध्ये खेळण्याबाबत अजून कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही.

डीकॉक हा मुंबई इंडियन्स संघाचा अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. त्याने नेहमीच विकेट कीपिंग आणि फलंदाजी मध्ये संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. रोहित शर्मासोबत संघाला चांगली सुरवात करून देण्यात त्याने नेहमीच मोलाची भूमिका बजावली आहे. याचमुळे मुंबईने कधीच त्याला वगळले नव्हते. आता उत्तम विकेटकीपिंग आणि फलंदाजी यांचा समतोल राखू शकणारा खेळाडू शोधणं मुंबई साठी कठीण होणार आहे.

डीकॉक काही दिवस क्रिकेट मधून ब्रेक घेणार अशी माहिती दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने क्रिकइन्फोशी बोलताना दिली आहे. पण डीकॉक किती दिवस क्रिकेटपासून लांब राहणार, हे मात्र अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. डीकॉककडे मुंबई इंडियन्सच्या विकेटकीपिंग सोबतच दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सुद्धा आहे.