Eknath Khadse



politics news- भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना गुरुवारी पहिल्यांदाच पक्षातील अंतर्गत गटबाजीचा अनुभव आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (political party) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेली परिवार संवाद यात्रा सध्या जळगावात आली आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या स्वागताचे बॅनर्स लावले होते.

मात्र, यापैकी एकाही बॅनरवर एकनाथ खडसे यांना स्थान देण्यात आलेले नाही. राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाने उत्तर महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी एकनाथ खडसे यांच्यावर सोपविली आहे. अशावेळी स्वागताच्या फलकावर त्यांचाच फोटो न लावण्यात आल्याने प्रचंड चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील गटबाजीतून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. आता शुक्रवारी जयंत पाटील जळगावात आल्यानंतर नक्की काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

------------------------------

Must Read

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावलेले 107 बॅनर्स उतरवले

जयंत पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या (political party) कार्यकर्त्यांनी भुसावळमध्ये लावलेले तब्बल 107 बॅनर्स नगरपालिकेकडून खाली उतरवण्यात आले आहेत. भुसावळ नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा फलक लावण्यासाठी मागितलेली परवानगी देखील इलेक्ट्रिकल पोलचे कारण पुढे करून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे भुसावळमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. परिणामी सध्या भुसावळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

एकनाथ खडसेंचा स्पर्श झालेले विकासाचे प्रकल्प भाजपने रखडवले: जयंत पाटील

एकनाथ खडसे यांचा स्पर्श झालेले विकासाचे प्रकल्प भाजपने रखडवून ठेवले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. ते गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या हस्ते अमळनेर येथील पाडळसरे धरणाचे भूमीपूजन झाले होते. मात्र, हे काम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे खडसे साहेबांचा स्पर्श झाला ती कामे करायचीच नाही, अशी भाजपची भूमिका होती की काय अशी शंका उत्पन्न होत असल्याची टिप्पणी जयंत पाटील यांनी केली होती.