virat kohli gave chance to suryakumar yadavऑनलाइन टिम :

sports news- टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला आगामी इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) टी-20 सिरीजमध्ये (cricket match) आराम मिळण्याची शक्यता आहे. 12 मार्चपासून आगामी टी-20 सिरीजची सुरुवात होत असून 23 मार्चपासून वनडे सिरीजची सुरुवात होणार आहे. यामध्ये 5 टी-20 आणि 3 वनडे खेळवल्या जाणार आहेत. पण या सिरीजमध्ये बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. चेन्नईतील दुसऱ्या टेस्टमध्ये देखील त्याला विश्रांती देण्यात आली होती. 

बीसीसीआयच्या (cricket match) अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून आतापर्यंत जवळपास 180 ओव्हर बॉलिंग केली आहे. त्यामुळं त्याला सध्या विश्रांतीची गरज असून या मालिकेत त्याला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. 

----------------------------