R. Ashwinsports news- भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन (R. Ashwin) टीम इंडियाचा सगळ्यात मोठा मॅच विनर म्हणून समोर आला आहे. चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने 6 विकेट (test cricket) घेत, पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केलं. 34 वर्षांच्या अश्विनने (spinner bowler) 75 टेस्टमध्ये 386 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय अश्विनने बॅटिंगमध्येही उत्कृष्ट कामगिरी करत भारताला कठीण परिस्थितीतून अनेकवेळा बाहेर काढलं. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी अश्विनने विहारीसोबत केलेली ऐतिहासिक पार्टनरशीप नेहमीच क्रिकेट रसिकांच्या लक्षात राहिल. या पार्टनरशीपमुळे भारताने सिडनी टेस्ट ड्रॉ केली, यानंतर पुढच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये भारताचा विजय झाला आणि बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर भारताने कब्जा केला. अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये 4 शतकं आणि 11 अर्धशतकं केली आहेत.

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत अश्विन 18व्या क्रमांकावर आहे. पण अश्विनपेक्षा चांगला स्ट्राईक रेट डेल स्टेन (42.3), रिचर्ड हॅडली (50.8) आणि ग्लेन मॅक्ग्राचा आहे. अश्विन टेस्ट मॅचमध्ये प्रत्येक 53.9 बॉलनंतर एक विकेट घेतो. 200 पेक्षा जास्त विकेट घेणाऱ्या स्पिनरमध्ये अश्विनचा स्ट्राईक रेट सर्वोत्तम आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 800 विकेट घेणारा मुथय्या मुरलीधरन, 719 विकेट घेणारा शेन वॉर्न आणि 619 विकेट घेणाऱ्या अनिल कुंबळेपेक्षा अश्विनचा स्ट्राईक रेट चांगला आहे. मुरलीधरनचा स्ट्राईक रेट 55, शेन वॉर्नचा स्ट्राईक रेट 57.4 आणि अनिल कुंबळेचा स्ट्राईक रेट 65.9 आहे.

-------------------------------

Must Read

1) अभिमानास्पद !!! इचलकरंजीच्या कन्येने पटकावला देशात प्रथम क्रमांक

2) अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात वाद पेटला

3) दहावी- बारावीच्या विध्यार्थ्यांसाठी परीक्षेआधीच खुशखबर !!!!

-------------------------------

भारताकडून सर्वाधिक टेस्ट विकेट घेणाऱ्यांच्या यादीत अनिल कुंबळे, कपिल देव (434) आणि हरभजन सिंग (417) यांचा समावेश आहे. कपिल देव यांचा स्ट्राईक रेट 63.9 आणि हरभजन सिंगचा स्ट्राईक रेट 68.5 एवढा होता. घरच्या मैदानातच अश्विनची कामगिरी सरस असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्याने घराच्या बाहेर 63.7 च्या स्ट्राईक रेटने विकेट घेतल्या. तर कुंबळेने बाहेरच्या देशात 74.5, हरभजन सिंगने 76.2 आणि कपिल देवनी 72.2 च्या स्ट्राईक रेटने विकेट घेतल्या.

अश्विनने (spinner bowler) त्याच्या टेस्ट कारकिर्दीमध्ये 28व्यांदा इनिंगमध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या. याबाबतीत त्याने इंग्लंडच्या इयन बोथम यांना पिछाडीवर टाकलं आहे. आता अश्विनच्या पुढे मुथय्या मुरलीधरन (67), शेन वॉर्न (37), अनिल कुंबळे (35), जेम्स एंडरसन (30) आणि ग्लेन मॅक्ग्रा (29) आहेत. याशिवाय अश्विनने एका मॅचमध्ये 10 पेक्षा जास्त विकेट 7 वेळा घेतल्या आहेत.

अश्विन टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात इनिंगच्या पहिल्या बॉलवर विकेट (test cricket) घेणारा 100 वर्षातला पहिला स्पिनर ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध चौथ्या दिवशी ओपनर रोरी बर्न्स याला माघारी पाठवलं. स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेने कॅच पकडला. 134 वर्षांच्या इतिहासात हा विक्रम करणारा अश्विन तिसरा स्पिनर आहे.

याआधी दक्षिण आफ्रिकेचे लेग स्पिनर बर्ट वोगलर यांनी 1907 साली इंग्लंडच्या टॉम हेवर्ड यांना पहिल्याच बॉलला आऊट केलं होतं. तर बॉबी पिल यांनी 1888 साली ऍशेसमध्ये पहिल्यांदाच अशी कामगिरी केली होती.