test cricketsports news- भारतीय संघ जवळपास वर्षभराने घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. इंग्लंडचा संघ ५ फेब्रुवारीपासून भारताविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यात ४ सामन्यांची कसोटी मालिका (test cricket) रंगणार असून त्यातील पहिले दोन सामने चेन्नईला तर दुसरे दोन सामने अहमदाबाद येथे होणार आहेत. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यांसाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. पण त्याचसोबत आता चेन्नईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीही प्रेक्षकांना हजेरी लावता येणार असल्याचं दिलं आहे.

BCCI आणि तामिळनाडू क्रिकेट संघटना यांनी घेतलेल्या निर्णयनुसार, इंग्लंड विरूद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी चिन्नस्वामी स्टेडियममध्ये ५० टक्के आसनक्षमतेने प्रेक्षकांना परवानगी देण्यात येणार आहे. तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.  त्याशिवाय, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनादेखील सामना कव्हर करण्यासाठी स्टेडियममध्ये परवानगी दिली जाणार असून त्यांची बसण्याची व्यवस्था प्रेस बॉक्समध्ये असणार आहे.

------------------------------------

Must Read

1) हुपरीत आत्मदहनाचा प्रयत्न, घटनेचे चित्रीकरण करण्यावरून बाचाबाची

2) Nora Fatehi चा सेक्सी डान्स बघून आईने फेकून मारली चप्पल....

3) Gold Silver Price Today : सोने एवढे कसे महागले? वाचा आजचे दर

-------------------------------------

“करोनासंदर्भात केंद्र सरकारने दिलेली नवी मार्गदर्शक तत्वे आणि राज्य सरकारने दिलेली नवी मार्गदर्शक तत्वे यांच्यानुसार मैदानी खेळांसाठी (test cricket)  प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचाच आधार घेत आम्ही हा निर्णय घेतला आहे. करोनाबाबत असलेला धोका लक्षात घेत आम्ही सुरूवातीला केवळ ५० टक्केच आसनक्षमतेने प्रेक्षकांना परवानगी देत आहोत”, असे त्या अधिकाऱ्याने सांगितलं.

"राज्य सरकारने लॉकडाउनचे नियम शिथिल करत प्रेक्षकांसाठी परवानगी दिली. पण पहिल्या कसोटीसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी द्यायची असेल तर त्याच्या तयारीला आमच्याकडे फारसा वेळ शिल्लक नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी ५० टक्के प्रेक्षकसंख्या स्टेडियममध्ये असेल असा निर्णय आम्ही घेतला आहे”, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.