ऑनलाइन टिम:

sports news-  भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील दुसऱ्या टेस्टमध्ये टीमइंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं टॉस जिंकून बॅटिंगचा  निर्णय घेतला आहे.टीम इंडियामध्ये अक्षर पटेलला (Axar Patel) संधी देण्यात आली आहे. अक्षर पटेलची ही पहिलीच टेस्ट आहे. शाहबाज नदीमच्या जागी अक्षरला संधी देण्यात आली आहे. पहिल्या टेस्टपूर्वी अक्षर जखमी झाल्यानं ऐनवेळी शाहबाज नदीमचा अंतिम 11 मध्ये समावेश करण्यात आला होता. एक उपयुक्त ऑलराऊंडर आणि हुशार स्पिनर अशी अक्षरची ओळख आहे. मागील वर्षी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) स्पर्धेतही अक्षरनं चांगली कामगिरी केली होती. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) कमतरता भरुन काढण्याचं आव्हान अक्षर समोर असेल.  टॉसपूर्वी झालेल्या एका खास कार्यक्रमात  विराट कोहलीनं टेस्ट टीमची कॅप अक्षर पटेलला दिली.

कुलदीप यादवचा समावेश, बुमराहला विश्रांती 

भारतीय टीमममध्ये कुलदीप यादवचाही (Kuldeep Yadav) समावेश करण्यात आला आहे. कुलदीप 2019 नंतर पहिल्यांदाच टेस्ट मॅच खेळणार आहे. मागील टेस्टमध्ये कुलदीपला न  घेण्याबद्दल जोरदार टीका झाली होती. आता या टेस्टमध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या जागी त्याला संधी देण्यात आली आहे.  त्याचबरोर टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली असून मोहम्मद सिराजचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

----------------------------

Must Read

-------------------------------

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल गाठण्यासाठी भारताला या सीरिजमधील उर्वरित तीन टेस्टपैकी एकही टेस्ट गमावून चालणार नाही. (sports news)

भारताची टीम : रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, अक्षर पटेल, आर. अश्विन, इशांत शर्मा मोहम्मद सिराज,  आणि कुलदीप यादव

इंग्लंडची टीम : रोरी बर्न्स, डॉमनिक सिबली, डॅनियल लॉरेन्स, जो रूट, बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स, मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लिच, ओली स्टोन